लाडक्या बहिणींच्या विरोधात जाऊ नका, नाहीतर घरी बसावे लागेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Photo of author

By Sandhya

अझिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी प्रश्नोत्तराच्या तासात गुटखा तंबाखूच्या अवैध विक्री बाबतचा प्रश्न उपस्थित करण्यात आला त्यावेळी अवैध दारू विक्रीमुळे लाडक्या बहिणीचे संसार उघड्यावर पडत असून अवैध दारू विक्रीची मागणी लाडक्या बहिणींची आहे, अध्यक्षांनी निर्देश देऊनही कारवाही होत नसल्याचा मुद्दा भाजपच्या अभिमान्यू पवार यांनी मांडला त्यावेळी यावर उत्तर देताना लाडक्या बहिणींच्या विरोधात जाऊ नका नाहितर घरी बसावं लागेल असा इशारा दिला.

हिवाळी अधिवेशनात राज्याच्या राजकारणातील अनेक महत्त्वाचे मुद्दे गाजले. अवैध दारूवर आळा घालण्याची लाडक्या बहिणींची मागणी असून, अध्यक्षांच्या निर्देशांनंतरही कारवाई होत नसल्यास ती चिंतेची बाब आहे. असे प्रशांत ठाकुर यांच्या गुटखा तंबाखूवर बंदी असूनही राज्यात शाळा कॉलेजच्या १०० मीटर परिसरात सर्रासपणे केली जाते. यावर आळा घालावा असा मुद्दा मांडला त्यावेळी अभिमन्यू पवार यांनी अवैध दारू विक्रीवर लाडक्या बहिणींची मागणी आहे असे मुद्दा उपस्थित केला. त्यावेळी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी लाडकी बहिण,,,,,, लाडकी बहिण,,,, अशा घोषणा दिल्या. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनी लाडक्या बहिणींच्या विरोधात जाऊ नका, घरी बसावं लागेल असा इशारा दिला. त्यांनी सांगितले की, लाडकी बहिण योजना सुरूच राहील सुरूच राहील आणि तिचे पैसे नियमित मिळतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. या योजनेची तुलना इतर कोणत्याही योजनेशी करता येणार नाही, असेही फडणवीस म्हणाले.

मुद्यायावर अस्लम शेख यांनी टेम्पो भरून अवैध गुटखा बाहेरच्या राज्यातून येत असतो टेम्पो मालासह पकडला जातो पण कारवाई होत नाही त्यामुळे अशा घटनेत आरोपीवर मोका सारख्या कायद्याचा वापर करून कारवाई करावी असा मुद्दा मांडला त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, अशा घटनेत मकोका सारखा कायदा लावता येत नाही त्यासाठी कायद्यात सुधारणा करावी लागेल तसा प्रस्ताव पाठविण्यात येईल असे सांगितले.

   अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर, विशेषतः रायगडमधील सुनील तटकरे यांच्यावर काही आरोपांच्या संदर्भातही चर्चा झाली. या आरोपांमागे कुणाचे पैसे आहेत, याचा शोध घेणे महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त झाले. त्याचबरोबर, नाना पटोले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी केली, ज्यातून सत्ताधारी पक्षाच्या आत्मविश्वासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

Leave a Comment

You cannot copy content of this page