
लोणावळा शहर आणि ग्रामीण हद्दीत मागील 15 ते 20 दिवसांत दोन गंभीर आणि सेंसिटिव्ह स्वरूपाचे गुन्हे घडले होते. एक गुन्हा लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीत तर दुसरा गुन्हा काही दिवसांनी लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत नोंद झाला.
या दोन्ही गुन्ह्यांनी स्थानिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण केलं होतं. मात्र पोलिसांनी त्वरित आणि प्रभावी कारवाई करत, केवळ 24 तासांच्या आत दोन्ही गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे.