लोणी काळभोर येथे बनावट आर.एम.डी. गुटख्याचा कारखाना केला उध्वस्तअंमली पदार्थ विरोधी पथक २ ची कामगिरीगुटख्यासहित दीड कोटींचा मुद्देमाल केला जप्त

Photo of author

By Sandhya

अंमली पदार्थ विरोधी मोहिम राबवित असताना लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीत पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पाटील वस्ती, ता. हवेली , जि. पुणे येथील एका गोडावून वर छापा टाकून बनावट आर.एम.डी. गुटख्याची सुंगधीत तुंबाखु व विमल गुटखा पान मसाला तसेच गोडाऊनच्या बाजुस शेतामध्ये बनावट गुटखा तंबाखु तयार करण्याठी लागणारे कच्चामाल त्यामध्ये बनावट सुपारी, सुंगधीत तंबाखु, थंडक, केमिकल, गुलाबपाणी, प्रिन्टेड पाऊच, बॉक्स व पोती असा एकुण १,००,००,०००/- (एक कोटी रूपयांचा)माल जप्त केला आहे . तसेच बनावट गुटखा वाहतुक करण्याकरीता मॉडिफाय करण्यात आलेली चारचाकी वाहन १. गोल्डन रंगाची इनोव्हा कार नंबर एम एच ४४ बी २०२३ , २. गोल्डन रंगाची इनोव्हा कार नंबर एम एच १२ डी एम ०८८५ व ३. काळया रंगाची टाटा नॅक्सोन एम एच १२ क्यू टी ८४६२ अश्या तीन चारचाकी ५०,००,००० ( पन्नास लाख )रूपयांची वाहने मिळुन आली आहे. असा १,५०,००,००० (दीड कोटींचा ) मुद्देमाल जप्त केला आहे .तसेच रोख रक्कम १,३०,०००/- मिळुन आली.
या कारवाईत रोहित दुर्गाप्रसाद गुप्ता, रामप्रसाद उर्फ बापू प्रजापती, अप्पु सुशिल सोनकर आणि दानिश मुसाकीन खान यांना ताब्यात घेण्यात आले असून सुमित गुप्ता हा फरार आहे.
या प्रकरणी बानावट गुटखा व बनावट सुगंधीत तंबाखु तयार करणारे कंपनीचे मालक व कामगार यांच्या विरूध्द लोणीकाळभोर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिल कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार,सहाय्यक पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पकंज देशमुख, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे निखील पिंगळे, सहाय्यक . पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक. २ गुन्हे शाखा पुणे शहर पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक अस्मिता लाड, तसेच पोलीस अंमलदार राजस शेख, संदिप जाधव, पृथ्वीराज पांडुळे, दत्तात्रय खरपुडे, संदिप देवकाते, गणेश गोसावी, देविदास वांढरे, शुभांगी म्हाळसेकर, दिनेश बास्टेवाड यांनी केली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page