
दिनांक 10 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 जयंती व वटपौर्णिमा आणि जागतिक पर्यावरण दिन यांचे औचित्य साधून जेजुरी येथील खंडोबा गडावर येथे श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्टच्या अध्यक्ष मनीषा खेडेकर यांच्या वतीने 300 वडाची झाडे महिला भाविकांना भेट देण्यात आली.
जेजुरी गडावर श्री मार्तंड देवसंस्थानच्या सहकार्यातून हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी काही वडाच्या रोपांचे वृक्षारोपण देवाचे सेवेकरी, भाविक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मल्हारी मार्तंड व राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा जयघोष करण्यात आला.यावेळी श्री मार्तंड देवसंस्थानचे विश्वस्त डॉ राजेंद्र खेडेकर युनिडायग्नोस्टिकचे संचालक राहुल निकम यांच्या हस्ते वडाच्या झाडांच्या वाटप संपन्न झाले. जेजुरी देवस्थानचे आधिकारी व श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्टचे कार्यकर्ते, सेवेकरी उपस्थित होते.
जेजुरी ग्रामस्थ, खांदेकरी मानकरी पुजारी यांच्या कुटुंबातील प्रत्येक दिवंगत सदस्याचे नाव प्रत्येक झाडावर असावं जेणेकरून त्या झाडाचा पालकत्व त्या कुटुंबा चे असेल अशी संकल्पना डॉक्टर राजेंद्र खेडेकर यांनी व्यक्त केली.