
पुणे, १ जुलै – शहरातील वडगाव बुद्रुक परिसरात आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास श्री गजानन ज्वेलर्स या सराफा दुकानात धक्कादायक दरोड्याची घटना घडली. या दरोड्यात तीन दरोडेखोर सामील होते. त्यांनी दुकानातून सुमारे पाच तोळे सोने लंपास केले.
या घटनेदरम्यान दुकानाच्या मालकीणवर हल्ला करण्यात आला असून त्या जखमी झाल्या आहेत. सुदैवाने त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, तपासाची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून दरोडेखोरांच्या मागावर शोधमोहीम राबवली जात आहे.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.