







मंचर भीमाशंकर रस्त्यावर गेले दोन ते तीन महिने खड्ड्यांचे साम्राज्य पहावयास मिळत आहे परंतु येथील स्थानिक राजकर्त्यांना याचे काहीही घेणे देणे नाही अशीच काहीशी परिस्थिती सात-आठ महिन्यापूर्वी झालेल्या रस्त्याच्या कामाची दिसून येत आहे मंचर भीमाशंकर रस्त्यावर नारोडी फाटा परिसरात नवीनच झालेल्या रस्त्यांच्या मधोमध खूप मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहेत.आज ठेकेदार हे नेत्यांच्या दावणीला बांधलेले असल्याचे खरोखरच दिसून आले संपूर्ण भारतातून बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री शेत्र भीमाशंकर या निसर्गरम्य परिसरामध्ये भगवान शिवशंकर अर्धनारी नटेश्वराचे दर्शन घेण्यासाठी येत असतात परंतु नेते या ठिकाणी असे सांगतात हे काम केंद्र शासनाचे आहे हे काम राज्य शासनाच आहे मग मी याकडे कशाला लक्ष देऊ अशीच वलग्ना देऊन स्थानिक लोकांचे प्रश्न मार्गी लावणे ऐवजी आर्थिक व्यवहारातून ठेकेदारांसोबत संगणमत करून कामाचा दर्जा कमी करून आपली झोळी भरण्यामध्ये धन्यता मानत असल्याचे दिसून येत आहे काही नेते तर ठेकेदारांकडून याच पैशात आपल्या वैयक्तिक घराची कामे देखील करून घेत असल्याचे दिसून येत आहे यात शासकीय अधिकारी देखील कमी पडत नाही म्हणजेच काम कसं झालं निष्कृष्ट दर्जाचे झालं तरी चालेल कामाचा दर्जा नाही सुधारला तरी चालेल परंतु माझी टक्केवारी मला भेटली पाहिजे याकडे जास्त कल असल्याचे देखील अधिकारी वर्गामध्ये दिसून येत आहे परंतु रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना म्हणजेच यात्रेकरूंना व स्थानिक नागरिकांना याचा खूप मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे अनेक वेळा लक्षात आणून देऊन देखील याकडे कुणाचेही लक्ष जात नाही कित्येक अपघात हे या खड्ड्यांमुळे झालेले आहेत काहींचा मृत्यू देखील या खड्ड्यांमुळेच झालेला आहे तरी याकडे आमदार खासदार स्थानिक जिल्हा परिषद सदस्य यांनी लक्ष दिल्यास अनेकांचा जीव वाचेल अशीच काही स्थानिक नागरिकांची मागणी संध्या सोबत बोलताना होत आहे…