वाल्हे येथील रक्तदान शिबिरात उत्स्फुर्त प्रतिसाद.

Photo of author

By Sandhya

१२०७ रक्तदात्यांनी केले रक्तदान

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंञी अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा.डॉ. दिगंबर दुर्गाडे यांच्या वतीने, भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबिरास १२०७ रक्तदात्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत रक्तदान केले.

वाल्हे (ता.पुरंदर) येथील ग्रापंचायतीच्या सभागृहात या भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे यांच्या हास्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना प्रा.डॉ. दिगंबर दुर्गाडे म्हणाले, “उपमुख्यमंञी अजित पवारांच्या कमाविषयीचा झपाटा सर्वांनाच माहीत आहे; त्यामुळे राज्याचा विकास झपाट्याने होत आहेच.
अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, ही सर्वच कार्यकर्त्यांसह माझीही इच्छा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ता म्हणून आमचा नेता राज्यातील सर्वोच्च पदावर असणे ही माझी इच्छा आहे. दरम्यान वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात बोलताना,
‘अजित दादा’ भविष्यात मुख्यमंञी होतील” असे मत, प्रा. डॉ. दुर्गाडे यांनी यावेळी व्यक्त केले होते.
यावेळी,प्रा. दुर्गाडे यांनी रक्तदात्यांस मोठ्या संख्येने रक्तदान करण्याचे आवाहन केले होते.

दरम्यान, प्रा. दुर्गाडे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, तरुणांसह जेष्ठ, तसेच महिलावर्गांनीही मोठ्या संख्येने उपस्थित, राहून, रक्तदान शिबिरात सहभाग घेत, प्रचंड गर्दीतही रांगेत उभे राहून, रक्तदानांसाठी नंबर येण्याची वाट पाहून, नंबर्स आल्यानंतर रक्तदान केले.
दरम्यान, पुणे जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी या रक्तदान शिबिरास भेट दिली.

या रक्तदान शिबिरामध्ये, महिला, पुरूष, युवा वर्ग यांनी मोठ्या संख्येने रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदवून रक्तदान उत्स्फुर्त प्रतिसाद देत, वाल्हे सारख्या ग्रामीण भागातून, पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विक्रमी १२०७ रक्तदात्यांनी रक्तदान केल्याबद्दल प्रा. डॉ.दिगंबर दुर्गाडे यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार मानले.
यावेळी, रक्तदान करण्याठी महिला व तरूणी मोठ्या संख्येने, उत्स्फुर्त प्रतिसाद देत उपस्थित होत्या.
यातील अनेक महिलांचे हिमोग्लोबीन चे प्रमाण शरीरामध्ये कमी असल्याने, अनेक महिलांची इच्छा असूनही रक्तदान करता न आल्याने अनेक महिलांनी नाराजी व्यक्त केली.
तर अनेक महिलांसह, तरूणी यांनी रक्तदान केल्याने, समाधान व्यक्त केले. तसेच यावेळी अनेक जोडप्यांनीही रक्तदान करून रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवला.
यावेळी, प्रत्येक रक्तदात्यांस उपस्थित मान्यवरांच्या व प्रा. दुर्गाडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.

दरम्यान, समोर समारंभ बोलताना प्रा.दुर्गाडे म्हणाले, या रक्तदान शिबिरासाठी आपल्या परिसरामध्यल्या, विषेषत्ताहा आपल्या जवळच्या सर्वच कार्यकर्त्यांनी, अतिशय उत्तम पद्धतीने नियोजन केले, एक्सुकेशन केले, आपलेपणा दाखवला, प्रेम दाखवले, माया दाखवली, मला असं वाटतं कितीही कोट्यवधी रूपये खर्च केले तरीही अशा प्रकारची मुले मिळणार नाहीत.
आपण भाग्यवान आहोत, आपल्याकडे ऐवढा तरूण वर्ग धडपडणारा आहे.
या सर्वाचेच मी मनःपुर्वक आभार व्यक्त करतो”
वाल्हे सारख्या ग्रामीण भागातून विक्रमी १२०७ रक्तदात्यांनी रक्तदान केल्याने त्यांचेही मी मनःपुर्वक आभार व्यक्त करतो.
पुढेही अशीच साथ लाभेल हेही निश्चितच आहे”.

रक्तदान शिबिर यशश्वी करण्यासाठी, प्रा. डॉ.दिगंबर दुर्गाडे सर मिञ परिवार, अक्षय ब्लड सेंटर हडपसर, ग्रामपंचायत वाल्हे, ग्रामपंचायत वागदरवाडी, ग्रामपंचायत सुकलवाडी, ग्रामपंचायत आडाचीवाडी व पुरंदर तालुक्यांसह अनेक तालुक्यातील तरूण -तरुणींनी परिश्रम घेतले.

Leave a Comment

You cannot copy content of this page