
संपूर्ण राज्याचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाची पंढरी नगरी ही आषाढी यात्रा जवळ आल्यामुळे भाविकांच्या गर्दीमुळे दुमदुमली आहे…
सध्या हजारो भाविक विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूर मध्ये येत आहेत.. अशातच बेळगावहून शुभम ज्ञानेश्वर पावले हा तरुण भाविक देखील पंढरपूरमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी आला होता…
विठुरायाच्या दर्शन घेण्या अगोदर शुभम हा आपल्या मित्रांसोबत पंढरपूर मधील चंद्रभागा नदीच्या पात्रामध्ये स्नानासाठी गेला… नदीमध्ये आंघोळीसाठी उतरलेला शुभम हा काळाच्या फेऱ्यात अडकला… पुंडलिक मंदिर येथे नदीमध्ये आंघोळ करत असतानाच पाण्याचा अंदाज न आल्याने अचानकपणे नदीच्या प्रवाहामध्ये शुभम पावले हा वाहून गेला…
मात्र मोठ्या भक्ती भावाने विठुरायाच्या दर्शनाला आलेल्या शुभम पावले याची विठ्ठलाच दर्शन घेण्याची इच्छा मात्र अधुरीच राहिली.. नदीमध्ये बुडून शुभम ज्ञानेश्वर पावले या तरुणाचा मृत्यू झाला आहे..
शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास चंद्रभागा नदीत एक दुखद घटना घडली. बेळगाव येथील 27 वर्षीय शुभम पावले या तरुणाचा पुंडलिक मंदिराजवळ नदीत बुडून मृत्यू झाला. विठुरायाच्या दर्शनासाठी मित्रांसोबत आनंदाने आलेल्या शुभमने सकाळी नदीत स्नानासाठी पाऊल टाकले, पण पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात वाहून गेला. चार तासांच्या अथक शोधानंतर त्याचा मृतदेह हाती लागला, पण तोपर्यंत सारं संपलेल होत.
आषाढी यात्रेच्या तोंडावर चंद्रभागा नदीकाठी भाविकांची गर्दी वाढत आहे. पवित्र स्नानासाठी येणाऱ्या भक्तांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने जीवरक्षक यंत्रणा तातडीने सज्ज करावी, अशी मागणी सध्या भाविक करत आहेत.