विविध उपक्रमांनी अखिल मातंग समाज चळवळीचा वर्धापन दिन झाला साजरा

Photo of author

By Sandhya


मंचर तालुका आंबेगाव येथील गोरक्षनाथ टेकडीवरील सांस्कृतिक हाॅल मध्ये रक्तदान शिबीर, नेत्र तपासणी शिबिर आणि आयुष्यमान भारत योजनेचे फाॅर्म भरणे यासारखे समाजोपयोगी उपक्रम अखिल मातंग समाज चळवळ महाराष्ट्र राज्यचे वतीने आयोजित करून वर्धापन दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी जुन्नर, आंबेगाव खेड, शिरूर श्रीगोंदा, पारनेर अहिल्यानगर आणि पुणे शहर इथून मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते अशी माहिती चळवळीचे सचिव राजू पंचरास यांनी दिली.
प्रथम साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या अर्धाकृती पुतळ्याची
मंचर शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी शिवाजी चोकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. मिरवणूकीत महिलांचा सहभाग उल्लेखनीय होता.
कार्यक्रमाच्या ठिकाणी शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सात तालुक्यातील सव्वीस मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी क्रांतिवीर लहुजी वस्ताद स्मारक समिती महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष अशोकराव लोखंडे, क्रांतीवीर लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष शंकरभाऊ तडाखे, सकल मातंग समाज राज्य समन्वयक भास्करराव नेटके, लहुजी समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अनिलदादा हतागळे, निरगुडसर गावचे लोकनियुक्त सरपंच रविशेठ वळसे पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल पाचर्णे, नगरसेवक दादाभाऊ लोखंडे, चळवळीचे माजी अध्यक्ष गजानन दादा राजगुरू, बबनराव पाटोळे, प्रविण महाराज लोखंडे, दिलीपराव पंचरास, भरत अस्वार, रघूनाथ पवार, कैलास बोभाटे आदी मान्यवर उपस्थित होते.
अशोकराव लोखंडे यांनी आपल्या भाषणात लहुजी वस्ताद स्मारकासाठी शासनाच्या सहकार्याने कोट्यवधी रुपयांची विकासकामे सुरू असल्याचे सांगितले. भास्करराव नेटके यांनी मनोगत व्यक्त करताना मातंग समाजाच्या हितासाठी असलेले आरक्षण उपवर्गीकरण या विषयावर मार्गदर्शन केले. अनिल दादा हतागळे यांनी समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या शिक्षणाचे महत्त्व विशद केले तर शंकरभाऊ तडाखे यांनी महाराष्ट्राच्या इतिहासात मातंग समाजाचे योगदान याविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन देवदत्तजी निकम यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील योगदान अधोरेखित केले, तसेच मातंग समाज आणि गावकारभारातील जुन्या काळातील आठवणी जाग्या करून मातंग समाजाचे पारंपरिक पद्धतीने व्यवसायात किती कष्ट होते हे स्पष्ट केले. अखिल मातंग समाज चळवळ महाराष्ट्र राज्यचे काम पाहून त्यांना सातत्याने मदत करण्याची भूमिका देवदत्तजी निकम यांनी व्यक्त केली.
यावेळी डॉ.मनोहर डोळे फाउंडेशनच्या टिमने उपस्थित समाज बांधवांची नेत्र तपासणी केली. तसेच आयुष्यमान भारत योजनेचे आँनलाईन नोंदणी करण्याचे महत्वपूर्ण काम अपर्णा सुयोग टेमकर आणि त्यांचे सहकारी यांनी केले. रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी शिवनेरी ब्लड बँक मंचर यांचे सहकार्य लाभले.
या सर्व उपक्रमांचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष संजयजी थोरात यांनी केले. आणि चळवळीच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षपद मुख्याध्यापक अरुण साळवे सर यांनी भूषविले. प्रास्ताविक मुख्याध्यापक शिवाजी अस्वार सर यांनी केले. अहवाल वाचन सोमनाथ पंचरास यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास मुसळे यांनी केले तर शिवाजी राजगुरू यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनोद राजगुरू, अविनाश लोंढे, गोरख माने, गणेश आल्हाट, स्वप्निल जाधव, सुनीताताई गायकवाड, राणीताई उमाप, सतीश पंचरास आणि बा. ज.गायकवाड सर या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Comment

You cannot copy content of this page