
पुणे– शनि शिंगणापूरचे विश्वस्त असलेल्या व्यक्तीच्या आत्महत्येप्रकरणी गंभीर दखल घेतली जात असून, प्राथमिक तपासात संबंधित व्यक्तीचे ॲप विकासातील सहभाग प्रथमदर्शनी दिसत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात पोलीस केस मागील आठवड्यात दाखल झाली असून, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर अधिकृत चौकशीला सुरुवात झाली आहे.
या घटनेवर बोलताना संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, “2021 साली शेटे नावाचे गृहस्थ नोकरीवर रुजू झाले होते ॲपचे काम तेव्हाच सुरू झाले होते. या ॲपच्या बाबतीत त्यांची थेट सहभाग दिसून येत आहे. त्यामुळे त्यांना आपल्यावर आरोप होतील ही भीती मनात घर करून आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.”
ते पुढे म्हणाले, “मी जिल्हा पोलीस प्रमुखांशी यासंदर्भात बोललो असून, या प्रकरणातील सर्व माहिती संकलन सुरू आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये ॲपला माहिती पुरवने फोन नंबर देणे हे सगळे गृहस्थ करत होते
दरम्यान, महाराष्ट्रात यंदा मे महिन्यापासूनच पावसाळ्याला सुरुवात झाल्याने आणि जुलै अखेरीसच अनेक धरणे भरू लागल्याने पाणी विसर्ग आणि पूर नियोजनाबाबत सरकार सतर्क असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, “आम्ही आजच पावसाळ्याचा आढावा घेतला आहे. अलमट्टीसाठी विशेष उपाययोजना केल्या असून, वरच्या धरणांतून किती पाणी सोडायचं आणि कृष्णा-पंचगंगेची पातळी कशी ठेवायची यावर आम्ही नियंत्रण ठेवले आहे. अलमट्टीमधून विसर्ग दुपटीने वाढवला असून, मला सध्या पूराचा धोका वाटत नाही. उजनी धरणदेखील यावर्षी पहिल्यांदाच जूनमध्येच भरले आहे. शेवटी आपल्या हातात धरणाचा विसर्ग नियंत्रित करणे हेच महत्त्वाचे आहे.”