
शिरूर नगरपरिषदे च्या प्रभागनिहाय आरक्षणात नगरसेवकांची संख्या आता २१ वरून २४ वर झाली आहे. आरक्षण सोडतीनंतर आगामी निवडणूकीसाठी राजकीय हालचाली वाढण्याची शक्यता आहे.
दि. ८ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १.०० या वेळेत शिरूर नगरपरिषदेच्या रसिकलाल धारिवाल सभागृहात प्रभाग निहाय आरक्षण सोडत काढण्यात आली. या वेळी प्रांताधिकारी पुनम अहिरे, मुख्याधिकारी प्रीतम पाटील, कार्यालयीन अधीक्षक राहुल पिसाळ, तसेच पंकज काकड, चंद्रकांत पठारे, विनोद उबाळे आदी अधिकारी उपस्थित होते. शिरूर नगरपरिषदेतील नगरसेवकांची संख्या यावेळी २१ वरून २४ इतकी वाढली असून, तीन नवीन नगरसेवक पदांची वाढ करण्यात आली आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार शिरूर शहराची एकूण लोकसंख्या ३७,३११ असून त्यापैकी अनुसूचित जातीची लोकसंख्या ४,६१३, तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या १,००८ इतकी आहे.
नवीन आरक्षणानुसार एकूण १२ प्रभागांमधून प्रत्येकी दोन नगरसेवक निवडून येणार असून, नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार आहे.
प्रभागनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे —
प्रभाग क्र. १: कामाठीपुरा, कैकाडी आळी, साळुंखे आळी, रम्यनगरी, प्रोफेसर कॉलनी, ढोर आळी, कुंभार आळी, मुंबई बाजार — सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण
प्रभाग क्र. २: कुंभार आळी, कुरेशी मोहल्ला, मदारी वस्ती, इस्लामपूरा, हल्दी मोहल्ला, बुरुड आळी, मुंबई बाजार — ओबीसी महिला, सर्वसाधारण
प्रभाग क्र. ३: सोनार आळी, मारूती आळी, अष्टविनायक सोसायटी, खांडरे आळी, भाजी बाजार, फकीर मोहल्ला, लाटे आळी, सुभाष चौक, हलवाई चौक — ओबीसी, सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र. ४: सरदार पेठ, मारुती आळी, चर्च, आंबेडकर नगर, सुशीला पार्क, खारा मळा, पाचारणे मळा, सूरज नगर — अनुसूचित जाती महिला, सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र. ५: महादेव नगर, जोशीवाडी, विठ्ठल नगर, पोलीस लाईन, स्टेट बँक कॉलनी — सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण
प्रभाग क्र. ६: गणेश नगर, गुजर कॉलनी, बागवान नगर, स्टेट बँक कॉलनी — ओबीसी महिला, सर्वसाधारण
प्रभाग क्र. ७: यशवंत कॉलनी, रयत शाळा सैनिक सोसायटी, जिजामाता सोसायटी, शिवाजी सोसायटी, रेव्हन्यू कॉलनी, करंजुळे वस्ती — ओबीसी, सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र. ८: डंबेनाला, आडत बाजार, कापड बाजार, राम आळी, मारुती आळी, सरदार पेठ, रेव्हन्यू कॉलनी, शांती नगर — ओबीसी महिला, सर्वसाधारण
प्रभाग क्र. ९: साई नगर, काची आळी, सय्यदबाबा नगर, संजय नगर, सिद्धार्थ नगर, कृषी उत्पन्न बाजार समिती — अनुसूचित जाती, सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र. १०: नवीन मार्केट यार्ड, वाडा वसाहत, गोपाळ वस्ती, छत्रपती कॉलनी, इंदिरा नगर, बीसी सोसायटी, इसवे नगर, पाबळ फाटा — अनुसूचित जाती महिला, सर्वसाधारण
प्रभाग क्र. ११: कामाठीपुरा, एस.टी. कॉलनी, प्रीतमप्रकाश नगर, पवार मळा, मंगलमूर्ती नगर — अनुसूचित जमाती महिला, सर्वसाधारण
प्रभाग क्र. १२: हुडको कॉलनी, बोरा कॉलेज, बाफना मळा, दिघे मळा — ओबीसी, सर्वसाधारण महिला
या सोडतीनंतर आगामी निवडणुकीसाठी शिरूरमध्ये राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.