शिवशक्ती-भीमशक्तीची एकतेची हाक; पुण्यात शिवसेना-रिपब्लिकन सेना मेळावा उत्साहात

Photo of author

By Sandhya

कोथरूड येथील अंबर हॉलमध्ये झालेल्या शिवसेना-रिपब्लिकन सेना कार्यकर्ता संवाद मेळाव्यात शिवशक्ती व भीमशक्तीच्या एकतेचा उत्साह दिसून आला. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, गृहराज्यमंत्री योगेश कदम व रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष विवेक बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली मेळावा पार पडला.

डॉ. गोऱ्हे यांनी प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये लोकप्रतिनिधी होण्याची ताकद असल्याचे सांगत, “शिवशक्ती-भीमशक्तीची संकल्पना आता वास्तवात उतरली आहे,” असे मत व्यक्त केले. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांसाठी शिवसेना कायम उभी राहील, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

Leave a Comment

You cannot copy content of this page