
श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखडा (कुंभमेळा २०२७ गर्दी व्यवस्थापन आणि इतर सोयीसुविधा) या विकास आराखड्यास उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून राज्य शासनाने २८८.१७ कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे.
या योजनेंतर्गत शटल, बस थांबा, ड्रॉप ऑफ शेड, स्वच्छता गृह, कॅफेटेरिया, ड्रायव्हर डॉर्ममटरी, पार्किंग कार्यालय, भाविक सुविधा केंद्र, विश्रांती गृह, स्वच्छता गृह, महानंदी द्वार, साईन बोर्ड, माहिती फलके, स्वागत द्वार, पार्किंग, लैडडस्केपिंग, बोर्डवॉक, एसटीपी रस्ते, विकास फर्निचर, पूरक सेवा, पाणी, ड्रेनेज,
अंतर बाह्य विद्युतीकरण, रोषणाई, वारसा रस्त्यांची प्रकाश व्यवस्था, फायर फायटिंग, सौर उर्जा, एअर कंडीशन, जनरेटर पंप, चार्जिंग, दुकाने, सभामंडप, कमलजा सभागृह, प्रशासन कार्यालय, महादेव वनविकास, बॉम्बे पॉइंट विकास, जंगल ट्रेल, श्री राम व दत्त मंदिर, साक्षी गणेश मंदिर, अंजनी माता मंदिर,जीर्णोद्धार, हनुमान मंदिर, कुंड, अँफीवथएटर, प्लाझा, कठीण व लँडस्केप
विकास, फर्निचर, पाणीपुरवठा नाली, लाईन जंगल मार्ग कॉंक्रीट, विद्युतीकरण (आंतरिक बाह्य) अग्निशमन, स्वागत कमान, पूरक नावे, कोटेश्वर मंवर्दर जीर्णोद्धार, ध्वनिक उपचार, माती व साहित्य परीक्षण, रोयल्टी,भू सर्वेक्षण, निगडाळे भीमाशंकर परिसर जमीन, इत्यादी कामांसाठी २८८.१७ कोटी रुपये प्रशासकीय मान्यता आदेश प्राप्त झाला आहे.
या विकास आराखड्यामुळे भाविकांना आधुनिक व सुसज्ज सुविधांचा लाभ मिळणार असून, भविष्यातील गर्दीचे प्रभावी व्यवस्थापन करता येणार आहे. श्री क्षेत्र भीमाशंकर हे महाराष्ट्रातील एक पवित्र ज्योतिर्लिंग क्षेत्र असून, भाविकांची सुरक्षितता, सुलभता आणि अध्यात्मिक अनुभूती यासाठी शासनाने घेतलेले हे पाऊल ऐतिहासिक आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास मंजुरी मिळाल्याने संपूर्ण परिसराच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारी ठरेल. या भव्य श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्यात गर्दी व्यवस्थापन, पायाभूत सुविधा, सार्वजनिक सोयीसुविधा तसेच भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक प्रत्येक बाबींचा समावेश आहे. जिल्हाधिकारी पुणे यांना संनियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्त करून, आराखड्याची अंमलबजावणी ठरलेल्या कालमर्यादेत पार पाडण्यासाठी स्पष्ट कार्ययोजना आखण्यात आली आहे. ज्यामुळे कुंभमेळा २०२७ चे आयोजन सुरळीत आणि सुरक्षित होईल.
उच्चाधिकार समितीच्या शिफारशीवर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समिती आणि राज्य सरकारने या विकास आराखड्यास अंतिम मान्यता दिल्यामुळे भाविकांना प्रत्येक सुविधेचा लाभ मिळणार आहे. श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्याला उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून मंजुरी मिळाल्याचे खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी सांगितले.