




जेजुरीच्या खंडोबा देवाचे मानकरी, श्री खंडोबा पालखी सोहळ्याचे पदाधिकारी,खांदेकरी व ग्रामस्थांच्या वतीने कऱ्हा नदीचे जलपूजन करण्यात आले.
दरवर्षी सोमवती यात्रेला महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाची पालखी कऱ्हा नदीला आणली जाते. या कऱ्हानदीवर खंडोबा व म्हाळसा देवीच्या उत्सव मूर्तींना कऱ्हेच्या पाण्याने अंघोळ घातली जाते. याच कऱ्हा नदीवर असणारे नाझरे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. या निमित्ताने गुरुवार दि 26 रोजी दुपारी 1 वाजता खंडोबा देवाचे मानकरी, श्री खंडोबा पालखी सोहळ्याचे पदाधिकारी खांदेकरी,पुजारी सेवक वर्ग व ग्रामस्थांनी कऱ्हा नदीवर जावून विधी पूर्वक कऱ्हा नदीचे जलपूजन केले.नदीला साडी चोळी श्रीफळ अर्पण करून भंडाराची उधळण केली. तसेच खंडोबा देवाची समाज आरती करण्यात आली.
यावेळी श्री खंडोबा पालखी सोहळा खांदेकरी मानकरी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे, पदाधिकारी सुधीर गोडसे,कृष्णा कुदळे,राजाभाऊ पेशवे,सचिन पेशवे, छबन कुदळे, गणेश आगलावे,संजय खोमणे,रोहिदास माळवदकर,रामदास माळवदकर,सुशील राऊत, सतीश घाडगे,भारत शेरे,भालदार गणेश मोरे,काशिनाथ मोरे,दीपक राऊत,माणिक पवार,विठ्ठल सोनवणे,जमीर पानसरे,तसेच जेजुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले,देवसंस्थान चे विश्वस्त मंगेश घोणे,माजी विश्वस्त नितीन राऊत,शिवराज झगडे,संदीप जगताप तसेच महिला भगिनी यावेळी उपस्थित होते.या धार्मिक विधींचे पौरोहित्य प्रसाद खाडे,शेखर सेवेकरी,गोविंद बेलसरे यांनी केले.
कऱ्हा नदीवर जलपूजन करताना जेजुरीकर ग्रामस्थ