विश्रांतवाडी: एके काळी सुसंस्कृत समजले जाणाऱ्या पुण्यात वाढत्या नागरीकरणा सोबतच महिलांवरील अत्याचाराचे प्रमाणही चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे.

नुकतीच विश्रांतवाडी – कळस एक गंभीर घटना घडली आहे, 29 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास पीडित विवाहित महिला विश्रांतवाडी चौकातून आपल्या नातेवाइकांकडे जात असताना कळस माळवाडी परिसरात दुचाकीवर आलेल्या तीन तरुणांनी अडवले.
आरोपी संकेत सावंत याने “इथे माझंच राज्य आहे, मी इथला डॉन आहे, चल माझ्यासोबत” अशी धमकी दिली. त्याच्यासोबत असलेल्या दोन तरुणांनीही “तू खूप सुंदर आहेस, आम्ही पैसे देतो, आज रात्री आमच्या सोबत चल” असे विकृत व अश्लील शब्द वापरले.
एकट्या महिलेला पाहून तिला मानसिक त्रास देऊन तिच्या आत्मसन्मानाशी खेळ करण्याचा हा प्रयत्न त्या महिलेने अतिशय धैर्याने सहन केला आणि लगेच विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.
पोलिसांनी संकेत सावंत सह तिन्ही आरोपीं विरोधात विनयभंग, धमकी व सार्वजनिक ठिकाणी महिलेला त्रास देण्याचे कलम लावून गुन्हा नोंदवला आहे.
महिलांवरील अत्याचाराची आकडेवारी:
एका सर्व्हे नुसार प्राप्त आकडेवारी नुसार
पुणे शहरात 2024 मध्ये विनयभंगाचे 927 गुन्हे नोंदवले गेले.
त्यातील 22 प्रकरणं ही सार्वजनिक ठिकाणी छेडछाड किंवा धमकी देण्याच्या स्वरूपातील होती.
विश्रांतवाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत गेल्या वर्षभरात अशा 7 तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.
या व्यतिरिक्त असंख्य प्रकारणा मध्ये अश्या घटनांची पोलिसात तक्रार केली जात नाही, कदाचित त्या मुळेच अश्या विकृती समाजात वाढत असताना दिसत आहे.