संजय जगताप यांचा भाजप प्रवेश निश्चित पुरंदर-हवेलीच्या राजकारणात नवे समीकरण

Photo of author

By Sandhya

सासवड, दि. १४: पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजय जगताप यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर, येत्या बुधवारी (दि. १६ जुलै) सासवड येथे भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. १४) सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन येथे संजय जगताप समर्थकांचा संवाद मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.
     “संजय जगताप आप आगे बढो.. हम तुम्हारे साथ है”, “तुम्ही बांधाल ते तोरण.. तुम्ही ठरवताल ते धोरण” अशा घोषणांनी आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन दणाणून गेले होते. पुरंदर आणि हवेली तालुक्यातील अनेक गावांचे आजी-माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सरपंच, सदस्य, माजी नगरसेवक, सोसायट्यांचे अध्यक्ष, सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेकांनी मनोगतातून, “तालुक्याच्या विकासासाठी तुम्ही घेतलेला निर्णय योग्य असून आम्हाला तो मान्य आहे. हा निर्णय फार पूर्वी व्हायला पाहिजे होता. ‘संजय जगताप हाच आमचा पक्ष आणि झेंडा आहे. आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत,” अशी ग्वाही दिली. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या हिंदुत्ववादी संघटनेने याप्रसंगी पाठिंबा दिला. 
   सागर जगताप यांनी मेळाव्याचे सूत्रसंचालन केले, तर संभाजी काळाणे यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी नंदकुमार जगताप, मार्तंड भोंडे, रमणिकलाल कोठडीया, राजवर्धिनी जगताप, यशवंत जगताप, संदीप फडतरे, राजेश काकडे, संजय हरपळे, महेंद्र शेवाळे, सुनिता कोलते, निलम होले, हाजी शाहजान शेख, अशोक निगडे, मनिषा नाझीरकर, देविदास कामथे, विक्रम दगडे, तुषार माहूरकर, विठ्ठल मोकाशी आदी मान्यवर उपस्थित होते. हेमंत सोनवणे, सुरेखा ढवळे, विजय अधिकारी, सुरेश काकडे, माणिक चोरमले, महादेव टिळेकर, अमोल गायकवाड, लक्ष्मण वाघापूरे, संजय टिळेकर, अॅड पूनम शिंदे, महेंद्र शेवाळे, अमित पवार, महेंद्र शेवाळे, अशोक झेंडे, संदीप बांदल, संजय आंबेकर, डॉ मनोज शिंदे, दादा बाठे, सुभाष कुतवळ, संजय चव्हाण, मंजुषा गायकवाड, अनिल जाधव, शिवराम शेंडकर, आण्णा कदम, विलास शेवाळे, सोमनाथ जाधव, माऊली गिरमे, किशोर लवांडे, रूपेश धुमाळ, बाळासो कुंजीर, संतोष भगत, अॅड महेश राणे, सुरज गदादे, अक्षय जगताप, अॅड विजय भालेराव, पप्पू गुजर, संजय हरपळे 
यांनी मनोगत व्यक्त केले. संदीप फडतरे यांनी आभार मानले. 
” गुंजवणी, विमानतळ याचबरोबर सर्वसामान्यांच्या अनेक प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी भाजपात प्रवेश करीत असल्याचे माजी आमदार संजय जगताप यांनी सांगितले.” 

Leave a Comment

You cannot copy content of this page