
केशवनगर-खराडी नदीवरील अर्धवट पुलावर शिवसेना ठाकरेंच्या नेतृत्वाखाली निषेध
पुणे-केशवनगर आणि खराडी भागाला जोडणाऱ्या नदीवरील पुलाचे काम गेल्या आठ वर्षांपासून संथगतीने सुरू असून, अद्यापही अपूर्ण अवस्थेतच आहे. यामुळे नागरिकांना दररोज वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि मूलभूत सुविधांचा अभाव यांचा सामना करावा लागत आहे.
या दिरंगाईविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुणे शहर आणि हडपसर- वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केले. हे आंदोलन अर्धवट बांधलेल्या पुलावर उभे राहून करण्यात आले.
या आंदोलनात शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, युवतीसेना आणि इतर अंगीकृत संघटनांचे आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शिवसेनेने प्रशासनास तातडीने ठोस कृतीचे आणि काम पूर्ण करण्याचे अल्टिमेटम दिले असून, अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जाण्याचा इशाराही दिला आहे.