संवादवारी उपक्रमास उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर यांची भेट

Photo of author

By Sandhya

उपक्रमाबाबत व्यक्त केले समाधान

बारामती, दि.२६: राज्य शासनाने घेतलेल्या विविध लोककल्याणकारी योजना, उपक्रम, अभियानाची माहिती देणारा ‘संवादवारी’ उपक्रमास उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले.

बारामती नगर परिषद येथे आयोजित प्रदर्शनास भेटीप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, तहसीलदार गणेश शिंदे, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड आदी उपस्थित होते.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने आयोजित संवादवारी उपक्रम स्तुत्य असून राज्य शासनाने घेतलेल्या विविध लोककल्याणकारी योजना, उपक्रम, अभियान समाजातील तळागाळापर्यंत प्रसार करण्यास मदत होते. या उपक्रमास वारीत सहभागी अधिकाधिक नागरिकांनी भेट देऊन विविध योजनांची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन श्री. नावडकर यांनी केले.

Leave a Comment

You cannot copy content of this page