साडेसतरानळी, हडपसर परिसरात दहशत माजवणाऱ्या आरोपींचा २४ तासात छडा; सहा आरोपी ताब्यात

Photo of author

By Sandhya

दि. ५ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास साडेसतरानळी चौक, हडपसर येथे दोन दुचाकीवर टोळक्याने हातात कोयते, तलवारी, लोखंडी रॉड घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली. त्यांनी दुकानांच्या शटरवर, वाहनांवर बेधुंदपणे वार करत तोडफोड केली आणि परिसरात भीतीचं वातावरण तयार केलं. फरार आरोपींना हडपसर पोलिसांनी अहिल्यानगर येथून जेरबंद केले, गुन्हेगारांची दहशत संपवण्यासाठी साडेसतरानळी परिसरात त्यांची धिंड काढून मस्ती जिरवली. जेथे दहशत तेथेच धिंड पुणे पोलिसांचा हा नवा पॅटर्न राज्यभर चर्चेत आला आहे.

या गंभीर घटनेनंतर हडपसर पोलिसांनी तत्काळ पोलीस ठाण्यात गुन्हा (गु. र. नं. ७४१/२०२५, भा.दं.वि. कलम १४३, १४७, १४८, १४९, ३०७, ३२७, ३४, शस्त्र कायदा कलम ४, २५, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३), १३५) अंतर्गत नोंदवून तपासाला सुरुवात केली.

हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज, स्थानिक माहिती आणि गुप्त बातम्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार करण्यात आली. दुसऱ्याच दिवशी म्हणजे ०६ ऑगस्ट रोजी २४ तासांच्या आत हडपसर पोलीस पथकाने कारवाई करत सहा आरोपींना ताब्यात घेतले. यामध्ये चार विधीसंघर्ष बालकांचा समावेश आहे

श्रेयस विकास आलेकर (वय २२, रा.हडपसर, पुणे)

रोहित संदीप खाडे (वय १९, रा. गोकुळ नगर , कात्रज, पुणे)

चार अल्पवयीन बालक यांचा समावेश आहे

या घटनेतील आरोपींनी गुन्हा केल्यानंतर तातडीने फरार होण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलीस उपआयुक्त डॉ.राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या नेतृत्वाखाली विविध पथकांनी सीसीटीव्ही, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने कारवाई राबवली.

अहिल्यानगर परिसरातून आरोपींना हडपसर पोलिसांनी मोठ्या शीथाफिन पकडल

सध्या गुन्हेगारांना जेरबंद करून त्यांची धिंड काढणे, हा पोलिसांचा नवा पॅटर्न राज्यभर चर्चेत आहे. याच प्रकारे या गुन्हेगारांना ज्या ठिकाणी त्यांनी दहशत माजवली होती, त्या साडेसतरानळी चौकातच त्यांची धिंड काढण्यात आली.
या कारवाईमुळे नागरिकांमध्ये दिलासा आणि पोलिसांबद्दल विश्वास वाढला आहे.

डॉ. अमितेश कुमार – पोलीस आयुक्त, पुणे शहर
रंजन कुमार शर्मा – सह पोलीस आयुक्त, पुणे
मनोज पाटील – अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पुणे

डॉ.राजकुमार शिंदे – पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५
संजय मोगले – वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर यांच्या मार्गदर्शनाखाली,
निलेश जगदाळे गुन्हे पोलीस निरीक्षक, अश्विनी जगताप पोलीस निरीक्षक गुन्हे,
पोलीस उप निरीक्षक – हसन मुलानी, सत्यवान गेंड, अंमलदार अविनाश गोसावी,
कर्मचारी – संदीप राठोड, दीपक कांबळे, सचिन जाधव, अमित साखरे, निखिल पवार, निलेश किरवे बापू लोणकर अमोल दनके, भगवान हंबर्डे, अजित मदने, अभिजीत राऊत, तुकाराम झुंजार, महेश चव्हाण, कुंडलिक केसकर, चंद्रकांत रेजितवाड, रविकांत कचरे, महावीर लोंढे, नामदेव मारडकर, ज्ञानेश्वर चोरमले, माधव हिरवे,
आदींनी ही धडक कारवाई केली.

क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल नाना यशवंत तुपे यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना तातडीने निवेदन देऊन कडक कारवाई करण्याची मागणी केली.
हडपसरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथके आरोपींच्या शोधात रवाना झाली अहिल्यानगर येथून सहा आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. जेथे आरोपींनी तोडफोड करून दहशत केली होती तेथेच या आरोपींची पोलिसांनी धिंड काढून नागरिकांना दिलासा दिला यावेळी शेकडो नागरिक उपस्थित होते.

हडपसर परिसरात वाढत्या कोयता गँगच्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी पोलिसांनी वेळेत दाखवलेली तत्परता आणि दृढ निश्चय प्रशंसनीय आहे. अशा पद्धतीने कडक आणि तातडीची कारवाई झाली तर गुन्हेगारी रोखली जाऊ शकते, असा विश्वास क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल नाना यशवंत तुपे यांनी व्यक्त केला.

Leave a Comment

You cannot copy content of this page