सासवडच्या स्मार्ट विकासासाठी भाजपला साथ द्या : प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे आवाहन

Photo of author

By Sandhya

​पंतप्रधान नरेंद्र मोदींना १०० शहरं आणि काही गावे स्मार्ट करायची आहेत. सासवडला स्मार्ट सिटी करण्यासाठी माजी आमदार संजय जगताप झपाटय़ाने काम करीत असून हे स्वप्न जवळ आहे आहे. यासाठी आम्ही दोघे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करू. सासवडला प्रत्येक हवी असणारी गोष्ट पुर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत., असे स्पष्ट करीत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांनी, यासाठी सासवडकर नागरिकांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आनंदीकाकी जगताप यांसह सर्व २० उमेदवारांना विक्रमी मतदान करण्याचे आवाहन केले.
सासवड नगरपरिषद निवडणुकीत भाजपा उमेदवारांच्या प्रचारासभेत प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण बोलत होते. याप्रसंगी आमदार योगेश टिळेकर, आमदार विक्रम पाटील, माजी आमदार संजय जगताप, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर वढणे, शहराध्यक्ष आनंद जगताप उपस्थित होते.

​आमदार योगेश टिळेकर यांनी आपल्या भाषणात दिवंगत आमदार चंदुकाका जगताप यांच्या राजकीय, सामाजिक आणि विकासाची परंपरा माजी आमदार संजय जगताप पुढे चालवत आहेत. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आनंदीकाकी जगताप यांच्या शिक्षण, सहकारी संस्था आणि सामाजिक कार्याचा विशेष गौरव करीत सासवडच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य शासनाचा निधी आवश्यक असून यासाठी कमळाला मत देण्याचे आवाहन केले.

माजी आमदार संजय जगताप यांनी, सासवडच्या योजना, निधी आवडणारे, पुरस्कारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून सासवडकरांच्या मेहनतीचा अपमान करणारे समोर उभे आहेत असे सांगत समाचार घेतला. मुख्यमंत्री देवाभाऊंनी आता या योजनांना ‘री टेंडर’ करून मंजूरी दिल्या असून याबरोबरच रस्त्यांबाबत डीपीआर तयार केला असून यामाध्यमातून भूयारी गटर, पाणी, घरगुती गॅस, भूमिगत विद्युत वाहिनी आणि सिमेंट-काँक्रीटचे रस्ते होणार असल्याचे सांगत सासवडचे सिंगापूर’ करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून देण्याचे आवाहन केले.

Leave a Comment

You cannot copy content of this page