सासवड पोलिसांकडून लाखोंचा गुटखा जप्त; दोघांना अटक

Photo of author

By Sandhya

सासवड, ता. २३ : सासवड पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे ९८ लाख १४ हजार ७३२ रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि मुद्देमाल जप्त केला. सोमवारी (दि. २१) गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी नारायणपूर-सासवड मार्गावर सापळा रचून एम एच १७ बी वाय १४२९ या ट्रकची तपासणी केली असता, त्यात प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा आढळून आला.

    याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालक कमलेश कुमार यादव (वय ४१) मुळ रा. हरीकापूरा, उत्तरप्रदेश. सध्या हडपसर आणि क्लीनर रंजीतकुमार पटेल (वय २३) मुळ रा. हनुमानगंज, उत्तरप्रदेश या दोघांना अटक केली असून त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम १२३,२२३, ३(५), सह कलम अन्न सुरक्षा मानके अधिनियम २००६ व नियमन २०११ चे कलम २६(२),२६(२)(अ), २७(३)(ड),२७(३)(इ) व ४९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

   सासवड पोलिसांनी वाहनासह विविध कंपन्यांचा गुटखा, पान मसाला आणि सुगंधी तंबाखू असा एकूण ९८ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस हवालदार जब्बार सय्यद यांच्या फिर्यादीवरून सासवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

Leave a Comment