
सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्त्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील लिपिक टंकलेखक (गट क) एकूण ७२ पदाकारिता महाराष्ट्र राज्याचे अधिवास असलेल्या युध्द काळात किंवा युध्द नसताना सैनिकी सेवेत मृत झालेल्या किंवा अपंगत्व येऊन त्यामुळे नोकरीसाठी अयोग्य झालेल्या माजी सैनिकांच्या कुटुंबातील फक्त एका व्यक्तीस त्यानंतरच्या पसंती क्रमाने पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने 31 डिसेंबर 2025 रोजी संध्याकाळी 23.59 वाजेपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.
वरील पदांपैकी 3 पदे ही अपंग संवर्गातून किमान 40 टक्के अपंगत्व असलेल्या उमेदवारांमधून दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार कर्तव्ये व जबाबदारीचा विचार करून गुणवत्ता, उपलब्धतेनुसार भरण्यात येतील. भरती प्रक्रिया टीसीएस-आयओएन यांचे मार्फत होणार आहे. प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. असे लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. निः, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.