

सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने उचले टोकाचे पाऊल
सोलापूर:- पुण्यात वैष्णवी हगवणेंचं प्रकरण ताजं असताना सोलापुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वैष्णवी हगवणेंप्रमाणेच सोलापुरात आशाराणी भोसले हिला सासरच्यांकडून छळ करण्यात येत असल्याने, तिने स्वतःचे जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे.
मागील तीन वर्षांपासून आशाराणी हिला नवरा पवन हा चारचाकी वाहन खरेदी करण्यासाठी आणि खर्चासासाठी माहेरहुन पैसे आण म्हणून मारहाण करत होता. तर सासू अलका भोसले आणि सासरा बलभीम भोसले हे देखील मुलीला स्वयंपाक नीट करता येतं नाही, मुलाला इज्जत देतं नाही असे म्हणत मानसिक छळ करतं होते. 2024 मध्ये देखील पती पवन याने आशाराणी भोसले हिला मारहाण करून माहेरी पाठवलं होतं. त्यावेळी महिला तक्रार निवारण केंद्राच्या मदतीने पती पत्नीचे समुपदेशन करण्यात आले होते. मात्र त्यानंतर देखील पती पवन भोसले, सासू अलका भोसले, सासरा बलभीम भोसले यांच्याकडून त्रास देणं सुरूच होते. त्यामुळेच मुलगी आशाराणी भोसले हिने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची फिर्याद आशाराणीचे वडील नागराज डोणे यांनी दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून मृत आशाराणीचे पती पवन भोसले, सासू अलका भोसले, सासरा बलभीम भोसले या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात नवरा पवन भोसले याला अटक करण्यात आली असून सासू अलका आणि सासरा बलभीम अद्याप फरार आहे. जो पर्यंत आरोपींना अटक होतं नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी कुटुंबियांची भूमिका आहे.
चार चाकी वाहन घेण्याकरता आणि इतर खर्चासाठी माहेरवरून पैसे घेऊन ये. तुला नीट स्वयंपाक करता येत नाही. तू नवऱ्याची इज्जत करत नाही, असं म्हणून तिचा वारंवार मानसिक व शारीरिक त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याप्रकरणी नवरा पवन भोसले, सासू अलका भोसले व सासरा बलभीम भोसले यांच्यावर मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चिंचोलीकाटी औद्योगिक वसाहतीमधील आशाराणी पवन भोसले (वय 22) हिने राहत्या घरातील दरवाज्याच्या चौकटीला साडी बांधून गळफास घेतला आहे. प्रथम ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, मयत आशाराणी भोसलेच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आहे. नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला होता.
आशाराणी भोसले यांना तीन वर्षाची मुलगी आहे. टोकाचा निर्णय घेतला त्यावेळी आशा भोसले या तीन महिन्याची गरोदर असल्याची नातेवाईकांनी सांगितले. अशा राणी भोसले हिला सासरच्या मंडळींकडून त्रास होत होता. याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहोळ पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे.
प्रतिनिधी:- निलेश बनसोडे