
एकीकडे पुणे शहर स्मार्ट सिटी म्हणून गाजत आहे, तर दुसरीकडे नागरिकांना स्वच्छ शौचालयाची मूलभूत सुविधासुद्धा उपलब्ध नाही. शहरभरातील सार्वजनिक शौचालये अतिशय अस्वच्छ, दुर्गंधीयुक्त आणि वापरण्यायोग्य नसल्यामुळे लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. महिला, वृद्ध आणि मुलांना या अवस्थेमुळे सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. .
“स्वच्छ भारत अभियान फक्त कागदोपत्री!” अशी टीका करत नागरिक आता मागणी करत आहेत की, स्मार्ट सिटीच्या नावाखाली केवळ दिखाऊ प्रकल्प न करता, प्रत्यक्षात स्वच्छता सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.