“स्वस्थ नारी – सशक्त परिवार” अभियानाचा पुणे जिल्ह्यात उत्साहात शुभारंभ

Photo of author

By Sandhya


देशभरात सुरु झालेल्या “स्वस्थ नारी – सशक्त परिवार” या राष्ट्रीय अभियानाचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मध्यप्रदेशातील दार येथे झाले. महिलांचे आरोग्यसेवा सुविधा सशक्त करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पुणे जिल्हास्तरीय उद्घाटन समारंभ बारामती येथील महिला रुग्णालयात खासदार सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. ग्रामीण भागातील हजारो महिला या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

हे अभियान १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान राबविण्यात येणार असून महिलांच्या आरोग्य सक्षमीकरण व जनजागृतीसाठी विविध सेवा उपलब्ध करून दिल्या जातील. कर्करोग, मधुमेह, हृदयरोग तपासणीसह निदान, उपचार, संदर्भ सेवा आणि सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया आयुष्यमान भारत (आभा कार्ड) अंतर्गत मोफत उपलब्ध होणार आहेत.

या अभियानाविषयी मार्गदर्शन डॉ. वैशाली बडदे यांनी केले. अॅड. स्नेहा भापकर यांनी गावोगाव व पाड्यापाड्यांवरील महिलांनी सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी सर्व महिला व बालकांनी या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. उपसंचालक (आरोग्य सेवा) भगवान पवार यांनी अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रास्ताविक तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी केले. यावेळी डॉ. चंद्रकांत मस्के, डॉ. प्रज्ञा भालेराव, डॉ. रामचंद्र हंकारे, डॉ. नवनाथ यमपल्ले, डॉ. सुहासिनी सोनवले, अॅड. स्नेहा भापकर, श्री. नितीन हाटे, डॉ. दिपक साळुंखे, डॉ. महेश जगताप, डॉ. बापूराव भोई, डॉ. अश्विनी बनसोडे, डॉ. विनोद स्वामी, श्री. धनंजय घाटे आदी मान्यवर उपस्थित होते.

“महिलांचे आरोग्य सक्षम झाले, तर परिवार आणि समाज अधिक सशक्त बनेल” या संकल्पनेला बळ देणारे हे अभियान प्रत्येक महिलेसाठी आरोग्याचे संजीवनी ठरणार आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page