
वारकऱ्यांच्या गाडीवर दरोडा आणि १७ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार; आरोपीचे स्केच जाहीर
दौंड (पुणे), २ जुलै २०२५ –
पंढरपूर वारीच्या मार्गावर पुणे-सोलापूर महामार्गावरील स्वामी चिंचोली परिसरात घडलेल्या अमानुष घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. ३० जूनच्या पहाटे दोन अज्ञात दरोडेखोरांनी वारकऱ्यांच्या गाडीवर हल्ला करून लूट केली आणि गटातील एका १७ वर्षीय मुलीवर अमानुष अत्याचार केला.
ही घटना एका भजनी मंडळाच्या भाविकांच्या गटासोबत घडली. वारकरी गट स्वामी चिंचोली येथे चहा साठी थांबले असताना, दोन अज्ञात हल्लेखोरांनी कोयत्याचा धाक दाखवत वाहनातील भाविकांना लुटले. त्यांनी डोळ्यांत मिरची पूड टाकून गोंधळ उडवला आणि महिलांचे दागिने हिसकावून घेतले. त्यानंतर त्यांनी एका अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचार केला.
या घटनेने संपूर्ण राज्य हादरले असून, पोलिसांनी तातडीने गुन्हा क्र. 448/2025 अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम 64, 309(6), 351(2), 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
आरोपीचा शोध सुरू; स्केच जाहीर
पुणे ग्रामीण पोलिसांनी या घटनेचा तपास अधिक गतीने सुरू केला असून, १० विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिसांनी संशयित आरोपीचे स्केच जाहीर करत नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
तुमच्याकडे माहिती आहे का?
खालील अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधावा:
SDPO बापूराव दडस – 📞 90496 64673
API राहुल गावडे – 📞 98231 65080
API दत्ताजी मोहिते – 📞 83088 44004