१० कोटी ७४ लाख १० हजार किंमतीची व्हेल माशाची उलटी जप्त ; आतापर्यंतची जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई

Photo of author

By Sandhya

व्हेल माशाची उलटी

गवसे (ता.आजरा) जवळ आजरा पोलिसांनी १० कोटी ७४ लाख १० हजार किंमतीची व्हेल माशाची उलटी आज (दि. २७) जप्त केली.

आतापर्यंतची जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. व्हेल माशाच्या उलटीचे वजन १० किलो ६८८ ग्रॅम आहे. या कारवाईने जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

याप्रकरणी कुडाळच्या पाच जणांना ताब्यात घवण्यात आले आहे. कुडाळ येथून व्हेल माशाची तस्करी करण्यात येणार असल्याची माहिती आजरा पोलिसांना मिळाली.

त्यानुसार आजरा पोलिसांनी आंबोली आजरा मार्गावर सहायक पोलीस निरीक्षक सुनिल हारुगडे यांच्या नेतृत्वाखाली सकाळपासून सापळा रचला होता. 

Leave a Comment

You cannot copy content of this page