कृषी विभागांतर्गत शासनाच्या विविध योजनांचा लाभ परिंचे, सासवड, पिसर्वे, जेजुरी मंडल या सर्व कृषी मंडल क्षेत्रांमध्ये मिळावा., यासाठी कृषी सहाय्यक, पर्यवेक्षक यांनी ध्येय ठेवून काम करावे असे सांगत पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी खरीप हंगाम नियोजन आढावा बैठकीत, शेतकरी बांधवांसाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने रासायनिक खते आणि बी – बियाणे यांचा पुरवठा कमी पडणार नाही., शेतक-यांनी शासनाची खते आणि बी बियाणे घ्यावीत असे आवाहनही यांनी केले.
सोमवारी ( दि १७ ) सासवड येथील पुरंदर पंचायत समितीच्या सभागृहात खरीप हंगाम नियोजन आढवा बैठक संपन्न झाली. यंदा आचार संहितेमुळे सदर बैठकीस विलंब झाला. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी सुरज जाधव, माजी जि प सदस्य सुदामराव इंगळे, प्रदीप पोमण, नंदकुमार जगताप, विठ्ठलराव मोकाशी, सुनिता कोलते, संभाजी गरूड, त्रिंबक माळवदकर, माऊली यादव, पी एस मेमाणे, निरा मार्केट कमिटीचे उपसभापती महादेव टिळेकर, संभाजी काळाणे, शांताराम बोराडे, संभाजी काळाणे यांसह कृषी सहाय्यक उपस्थित होते.
तालुका कृषी अधिकारी जाधव यांनी, बी बियाणे, खत, औषधे यांची मागणी आणि उपलब्धता तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. खरीपाच्या ८० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असल्याचे सांगत तालुक्यात खरीप पूर्व राबवलेले बिजप्रक्रीया, हुमनी नियंत्रण आदींबाबत माहीती देत शासनाने ठरवून दिलेले खतांचे दर प्रत्येक दुकानात लावण्यात येणार असून त्यापेक्षा अधिक दराने विक्री होत असल्यास शेतकऱ्यांनी तक्रार करावी असे आवाहन केले.
आमदार संजय जगताप यांनी, चारही कृषी मॉडेलमध्ये मनरेगा आणि भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी कृषी सहायक, मंडल कृषी अधिकारी यांना ध्येय देणे. फार्मर प्रोड्युसर कंपनी सुरू करावी., चारही मंडलमध्ये शासकीय रोपवाटिका, कांदा चाळ, अन्न प्रक्रिया उद्योग, शेडनेट या योजना राबविण्यात याव्यात. तसेच माती परीक्षण केंद्रांची सुविधा, पिक विम्यात सोयाबीनचा समावेश, तुती रेशीम उद्योगासाठी तुती लागवड करण्यास शेतकर्यांत जनजागृती व प्रोत्साहन करावे अशा सुचना केल्या.
फळझाडांच्या रोपांचे पैसे मिळावेत…
शासकीय रोपवाटिकेचे प्रस्ताव तातडीने तयार करावेत त्यासाठी निधीची व्यवस्था करतो असे सांगत आमदार संजय जगताप यांनी, फळझाडांच्या रोपांचे पैसे शेतकऱ्यांना मिळत नाहीत, हा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी विभागीय कृषी अधिका-यांसोबत चार दिवसांत बैठकिचे आयोजन करा असे कृषी अधिकारी जाधव यांना सांगितले. महाबीटी योजनांची माहिती देण्यासाठी कृषी सहाय्यकांना प्रशिक्षण द्यावे., जेणेकरून ते शेतकर्यांना माहिती देऊन लाभ देतील.
सिताफळास जी आय टॅगींगसाठी पाठपुरावा
अंजीराप्रमाणे पुरंदरच्या सिताफळालाही भौगोलिक मानांकन ( जी आय टॅगींग ) मिळावे यासाठी स्वतंत्र अधिका-यांची नेमणूक करावी., दरमहा याचा आढावा घेणे. सिताफळ इस्टेट आणि फार्मर प्रोड्युसर कंपनीमुळे पुरंदरच्या सिताफळात भौगोलिक मानांकन ( जी आय ) मिळणार असून यामुळे सिताफळ उत्पादक शेतकऱ्यांना सिताफळ लागवडीपासून ते प्रक्रिया उद्योग आणि निर्यात करून चांगल्या आणि वाढीव बाजारभावाचा फायदा होणार असल्याचे आमदार संजय जगताप यांनी सांगितले.