रवींद्र धंगेकर : मंत्रीच अधिकार्‍यांना पाठीशी घालतात…

Photo of author

By Sandhya

रवींद्र धंगेकर

पुण्यामध्ये रविवारी एका हॉटेलमध्ये ड्रग घेत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पोर्शे कार अपघातप्रकरणी धंगेकर यांनी उत्पादन शुल्क विभागावर ताशेरे ओढले होते. त्यानंतर आता रविवारच्या घटनेवर देखील धंगेकर यांनी कडक भूमिका पत्रकारांशी बोलताना मांडली आहे.

… तरूणाईला बरबाद करण्याचं काम धंगेकर म्हणाले, आम्ही एवढं मोठं आंदोलन करूनसुद्धा संबंधित अधिकार्‍याची बदलीसुद्धा झाली नाही. याचा अर्थ असा आहे की, शंभूराज देसाई या अधिकार्‍यांना पाठीशी घालतात.

हा पैसा राजकारणात वापरण्यासाठी आमच्या तरुणाईला बरबाद करण्याचं काम हे लोकं करतात. मी तुम्हाला यादी देऊ शकतो की, कुठल्या हॉटेमधून किती पैसे जातात, माझ्याकडे यादी आहे. यादीत प्रचंड प्रमाणातील पैसे हप्त्याच्या स्वरूपात पोलिसांना मिळतात.

निव्वळ पैसे, हप्ता याच्या नादात पुण्याचं नाव बरबाद करण्याचे काम ही मंडळी करीत आहेत. आम्ही रस्त्यावर उतरून या लोकांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. येणार्‍या अधिवेशनात या विषयावर आम्ही बोलणार.

Leave a Comment

You cannot copy content of this page