अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच लिफ्टमधून गेल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे हे आधीच काँग्रेसच्या लिफ्टमध्ये शिफ्ट झाल्याने त्यांची लिफ्ट सहाव्या मजल्यावर पोहोचणार नाही, असा टोला ठाकरेंना लगावला.
निरोपाचे नाही तर निर्धाराचे अधिवेशन लिफ्टमध्ये गेल्याने ते युतीत येणार आहेत असे होत नसते, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. निरोपाचे नव्हे; निर्धाराचे अधिवेशन उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत खोके सरकारच्या निरोपाचे हे अधिवेशन असल्याची टीका केली. या टीकेलाही मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिले.
ते म्हणाले, हे अधिवेशन निरोपाचे नाही तर निर्धाराचे आहे. निरोप कोण कोणाला देईल ते जनता ठरवेल. दोन वर्षांच्या कामाच्या जोरावर आम्ही पुन्हा सरकार आणू, असा विश्वासही शिंदेंनी व्यक्त केला. तेच लिंबू-मिरचीवाले… लंडनमधल्या पंचतारांकित हॉटेलपेक्षा पंचतारांकित शेती केव्हाही बरी.
उद्धव ठाकरे यांना शेतकऱ्यांचे दुःख काय कळणार? शेतकऱ्याने चांगली नगदी पिके घेऊ नयेत का, स्ट्रॉबेरी, ड्रॅगन फुट लावू नये का, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना करतानाच उद्धव ठाकरे यांच्या डोक्यात सतत अमावस्या-पौर्णिमा असते. ते लिंबू-मिरचीवाले आहेत.
पण माझ्याकडे सर्व प्रकारची फळे आहेत, असा टोला त्यांनी लगावला. शेतकऱ्यांचे दुःख कळण्यासाठी चिखल तुडवावा लागतो उद्धव ठाकरे यांना शेतकऱ्यांचे दुःख काय कळणार? शेतकऱ्यांचे दुःख समजण्यासाठी चिखल तुडवावा लागतो, घरात बसून काम होत नसते.
स्थूलपणामुळे हाेणारे घातक परिणाम अन् त्यावरचे उपाय फेसबुक लाईव्ह करून शेती कळत नाही. त्यासाठी बांधावर जावे लागते, अशी टीकाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. सध्या अजित पवार महायुतीत नाराज असल्याची चर्चा आहे. त्यावर बोलताना आमचे महायुतीचे काम व्यवस्थित सुरू आहे. महायुती मजबुतीने काम करत आहे. कोणी नाराज नाही, विरोधक अकारण वावड्या उठवत आहेत, असे एकनाथ शिंदे म्हणाले.