आज २८ जूनला राज्य सरकारने अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्री अजित पवार या अर्थसंकल्पातील तरतुदींची माहिती देत आहे. सरकार या अर्थसंकल्पात महिला, तरुण, शेतकरी या वर्गासाठी मोठ्या घोषणा केल्या आहे. विशेष म्हणजे याच अर्थसंकल्पात राज्य सरकार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचीही घोषणा केली आहे. स्त्री ही कुटुंबाचा आधार आहे.
एकहाती कुटुंब सांभाळणाऱ्या महिलाही आपल्याला पाहायला मिळत आहेत. या महिलांना सधी उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी आहे. म्हणूनच आमच्या लेकी-बहिणींसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची मी घोषणा करत आहे. ही एक व्यापक आणि महत्त्वाकांक्षी योजना आहे.
महिलांचे स्वावलंबन, पोषण अशा सर्वांगीन विकासासाठी या योजेअंतर्गत 21 ते 60 वर्षे वयाच्या पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्यात येईल. यासाठी दरवर्षी 46 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात येईल. या योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून करण्यात येईल. असेही अजित पवार यांनी घोषणा करतांना सांगितले.
अशातच आता उद्धव ठाकरे यांनी मुंबईत मराठा माणसाला घरं मिळालीच पाहिजे अशी मागणी केली आहे शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे विज बिल माफ करावे अशी मागणी ठाकरे यांनी केली. लाडकी बहीण या योजनेच आम्ही स्वागत करतो पण महिला पुरुषांमध्ये भेद न करता लाडका भाऊ किंवा मुलगा अशीही योजना असावी असेही ठाकरे म्हणाले.