पृथ्वीराज चव्हाण : फडणवीस अडीचशे पार का म्हणत नाहीत?

Photo of author

By Sandhya

पृथ्वीराज चव्हाण

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डोळ्यासमोर दारुण पराभव दिसत असल्याने ते २०० पार म्हणत आहेत. एवढा आत्मविश्वास असेल, तर मग २५० किंवा २८० पार का म्हणत नाहीत, असा टोला माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत लगावला.

श्री. चव्हाण म्हणाले, ‘लोकसभेला मतदारांनी भाजपची झोप उडवली आहे. महायुतीत लाथाडी सुरू असून, १४ मंत्रिपदे आणि १२ विधानपरिषद जागा रिक्त आहेत. ती भरली जात नाहीत. हे या सरकारचे अपयश आहे.’

महाविकास आघाडी फेक नेरेटिव्ह पसरवत आहेत, हा सत्ताधारी आरोप करत आहेत, या प्रश्नावर चव्हाण म्हणाले, ‘फेक नेरेटिव्ह हा शब्दप्रयोग ऐकायला बरे वाटत असेल; परंतु आज बेरोजगार युवक फिरत आहेत. कांदा निर्यातीवर बंदी घातल्याने शेतकऱ्यांनी तुम्हाला पाडले आहे. हा फेक नेरेटिव्ह आहे का? अनेक राज्ये महाराष्ट्राच्या पुढे गेली आहेत.

अजित पवार यांनी विधिमंडळात सांगितले आहे. राज्याचे दरडोई उत्पन्न देशात अकराव्या स्थानावर गेले आहे.’ शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी वाढली. शेतीमालाला हमीभाव मिळत नाही, हे सर्व प्रश्न फेक नेरेटिव्ह आहेत का? असा सवाल चव्हाण यांनी केला.

मुंबईत जोरदार पाऊस झाल्यामुळे लोकांचे हाल होत आहेत. प्रशासनाचे लक्ष नाही. सगळेजण राजकारणात गुंतले आहेत. जोरदार पावसाने स्वत: मदत व पुनर्वसनमंत्री रेल्वे रुळावर अडकणे ही शोकांतिका आहे, अशी टीकाही श्री. चव्हाण यांनी केली आहे.

Leave a Comment