राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ शरद पवार यांच्या भेटीसाठी पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी दाखल झाले आहे. भुजबळ सिल्वर ओकवर पोहचल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
भुजबळ-पवार यांच्या या भेटीमुळे राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार का अशा चर्चा सुरू झाल्या आहे. दरम्यान भुजबळ शरद पवार यांना भेटायला गेल्यानंतर राजकीय वर्तुळात याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली असून, सर्वच राजकीय पक्षांचे नेते यावर प्रतिक्रिया देत आहेत.
भेट कशासाठी? बारामती येथे रविवारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची सभा झाली. या सभेत बोलताना छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर आरोप केले होते.
ते म्हणाले होते की, “बारामतीतून फोन गेल्यामुळे आरक्षणाच्या संदर्भातील सर्वपक्षिय बैठकीला विरोधी पक्षांचे नेते आले नाहीत. वास्तविक शरद पवार मोठे नेते आहेत.
त्यामुळे त्यांनी सुद्धा या बैठकीला यायला हवे होते.” दरम्यान छगन भुजबळ यांच्या या टीकेमुळे शरद पवार नाराज झाले आहेत. त्यामुळे भुजबळ त्यांच्या भेटीला गेल्याची माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली आहे.