शिवाजी महारांजाचा विषय निघतो तेव्हा वाद विवाद का निर्माण केले का जातात मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी होणारे वाद विवाद थांबवा असे आवाहन उदयनराजे यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वाघनखांचे दर्शन व वाघनखे ठेवण्यात येणाऱ्या दालनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवाजी महाराजांच्या नावावर होणारे विविध वाद विवाद थांबवण्याचे आवाहन केले.
उदयनराजे भोसले म्हणाले, दुसरा कोणता विचार देशाला अखंड ठेवू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार देशाला अखंड ठेवू शकतो. देशात विविध जाती धर्माचे लोक वास्तव्य करत आहेत.
त्यामुळे कुठल्याही पक्षाचे लोक त्यांच्यामध्ये वाद विवाद करत असतील तर त्यांना माझी कळकळीची विनंती त्यांच्यामध्ये वितष्ट निर्माण करू नका.त्यांच्या मध्ये वाद निर्माण करू नका त्यातल्या त्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या वस्तूंमध्ये मनभेद तयार करू नका.
शिवाजी महाराजांच्या वरून अनेकदा वाद विवाद होत असतात. महाराष्ट्र शासनाने समिती नेमावी शिवाजी महाराजांचे चारित्र प्रकाशित करावे. आपण देव पाहिला नाही मात्र देवाचे सण तारखे प्रमाणे होत असतात.
मात्र, शिवाजी महारांजाचा विषय निघतो तेव्हा वाद विवाद का निर्माण केले का जातात?. त्यांची कोणती वस्तु असेल त्याबाबात का वाद विवाद निर्माण केले जातात. असा प्रश्न उदयराजे भोसले यांनी विचारला.
छत्रपती शिवाजी महाराजांवरून अनेकदा वेगवेगळी मते वाद निर्माण केले जातात ते करू नका. महाराष्ट्र शासनाने समिती नेमावी. शिवाजी महाराजांचे चरित्र प्रकाशित करावे अशी मागणी त्यांनी केली.
वाघनखं ओरिजनल- शिवाजी महाराजांच्या वाघनखावरून का वाद निर्माण केले जातात. ग्रँड डफ याला प्रतापसिंह महाराजांनी त्यावेळी भेट दिली होती. ज्या प्रकारे तलवार एकच नव्हती अनेक होत्या. त्याच प्रमाणे हे वाघनखं त्याचेच प्रतिक आहे. अनेक वाघनखं होती. त्यातीलच हे ओरिजनल आहे. त्याची नोंद इतिहासामध्ये आहे. – छत्रपती उदयनराजे, खासदार