महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार बोकाळला आहे मुख्यमंत्री लाडकी बहिणनंतर मुख्यमंत्री लाडका कंत्राटदार योजना सुरु केली आहे. ज्यामध्ये चड्डा नावाच्या कंत्राटदाराला ४०० कोटी रुपये द्यायचा निर्णय झाला आहे,’ असे म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शिंदे सरकारवर मोठा आरोप केला आहे.
काय म्हणाले विजय वडेट्टीवार? “महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार बोकाळला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिणनंतर मुख्यमंत्री लाडका कंत्राटदार योजना सुरु केली आहे. त्यात चड्डा नावाच्या कंत्राटदाराला ४०० कोटी रुपये द्यायचा निर्णय झाला आहे.
या चड्डाला सोन्याने पिवळा करण्याचा प्रयत्न असून हा चड्डा भाजपचा दिल्लीत नगरसेवक होता, त्यानंतर काही काळ सीबीआयच्या ताब्यात होता,” असा मोठा खळबळजनक दावा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
“जिथे कमिशन मिळत नाही तिथं लक्ष देणार नाही. कमिशन मिळत असेल तर एक पाऊल पुढे असं हे सरकार आहे, अशी टीका करत पुराने गडचिरोली भागात थैमान घातले आहे. पिकांचे नुकसान झाले आहे. सरकारनं लवकरात लवकर मदत करावी. पंचनाम्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही विजय वडेट्टीवार यांनी केली.
“सरकारी कर्मचाऱ्यांना संघाच्या कार्यक्रमांना सहभागी व्हायला लावलेत. आता ते फुलपँटवर आलेत. उद्या ते हाफपँट घालायला सांगतील नाहीतर एक निर्णय घ्या सरकारी कर्मचाऱ्यांना आता हाफपँटवर यायला सांगा, असा उपरोधिक टोला लगावत विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारच्या निर्णयावरुन जोरदार टीका केली.