मनोज जरांगे : “ठाकरे, पवार, पटोलेंनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका…”

Photo of author

By Sandhya

मनोज जरांगे

भाजपाचे जे नेते टीका करत आहेत ते बिथरले आहेत, त्यांची डोकी कामातून गेली आहेत. त्यांना कळत नाही की मला शांत कसं बसवायचं. मी गोरगरिबांची लढाई लढतो आहे. पिसाळलेल्या कुत्र्यासारखं वागत आहेत. त्यांना आम्ही भाव देत नाही.

आम्ही तेव्हाच ओळखलं आहे की यांची बुद्धी कुठपर्यंत आहे, ज्ञान कुठपर्यंत आहे. आपण म्हणतो राजकारणी आहे मोठ्या गाडीत बसतो, चांगले झगे घालतो. पण हे कोणत्या टोकाला चालले आहेत? हे आम्हाला समजलं आहे.

हे सगळे छिछोरे, चिल्लर चाळे करत आहेत. मराठ्यांपुढे तुम्ही शांत बसला नाहीत, डिवचत राहिले तर राजकीय करिअर संपणार. मराठा तु्म्हाला राजकीयदृष्ट्या संपवणार. असा इशाराच भाजपा नेत्यांना मनोज जरांगेंनी दिला आहे.

मराठा समाजाचा सरकारवर रोष आहे- गावखेड्यात आमची पोरं टपऱ्या चालवत आहेत, रिक्षा चालवत आहेत, नांगरणी करत आहेत. या सगळ्यांना वाटतं की माझं लेकरु मोठं झालं पाहिजे. कंपन्यांमध्ये सफाई कामगार म्हणून आमचे काम करत आहेत, त्यांनाही वाटतं की आपण हे केलं पण लेकरांना न्याय मिळालं पाहिजे.

मुंबई, पुण्यात आयुष्यभर कंपन्यात कामं करतात, हमाली करतात, व्यवसाय करतील, हॉटेल टाकतील, कुणी वडा-पावचा गाडा लावतात. अशा काबाडकष्ट करणाऱ्या लोकांनाही वाटतं की आमची मुलं मोठी झाली पाहिजेत. हे सगळे लोक खवळले आहेत.

मी मराठा समाजासाठी काम करतो आहे तरीही मला टार्गेट केलं जातं आहे त्याचाही राग समाजाच्या मनात आहे. सत्ताधाऱ्यांनी काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात. आता यांच्या विरोधात रोष आहे. मराठे जशास तसं उत्तर दिलं जातं आहे. असंही मनोज जरांगे म्हणाले.

शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोलेंनी भूमिका स्पष्ट करावी

“शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांनी भूमिका स्पष्ट करावी. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर भूमिका काय? असं देवेंद्र फडणवीस म्हणाल्याचं मी ऐकलं.

जर फडणवीस इतकं क्लिअर सांगत असतील तर या तीन नेत्यांनी स्पष्टपणे सांगावं की त्यांची भूमिका नेमकी काय आहे? मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं हे तिघांनीही सांगावं.

जर हे तिघेही म्हणत नसतील तरीही सरकारने बिनधास्त ओबीसींना आरक्षण द्यावं. सरकारने जर मराठा आरक्षण दिलं तर मराठे तुम्हाला पुन्हा डोक्यावर घेऊन नाचतील. काहीही गरज नाही, तुम्ही विचारलं त्यांनी सांगितलं नाही तर तुम्ही आरक्षण द्या.” असं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे.

Leave a Comment