नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे गुजरातचे व्यापारी असून त्यांनी सत्तेच्या आणि दहशतीच्या बळावर बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली शिवसेना ओरबाडून घेतली, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे हे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, अशी लोकभावना आहे, असंही राऊतांनी म्हटलंय. संजय राऊतांनी आज मुंबईत माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.
गेल्या अडीच वर्षात आणि त्याआधी आमदार आणि खासदार विकत घेण्यासाठी ३-४ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचा आरोप संजय राऊतांनी केला.
आमच्या शिवसेनेतून नगरसेवकांपासून शाखाप्रमुखांपर्यंत सगळे आपल्या गटात ओढण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी हे पैसे खर्च केले, असंही राऊत म्हणाले.
मोदी-शहा गुजरातचे व्यापारी असून औरंगजेबाचे कितीही चेले चपाटे आले तरी त्यांना महाराष्ट्रात शिवसेनेला खतम करता येणार नाही. ठाकरे यांचे यांचे नेतृत्व संपवता येणार नाही.
हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. इथे फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचा फॅन्स क्लबच चालतो. औरंगजेब गुजरातमध्ये जन्माला आला. आमच्याकडे शिवाजी महाराज जन्माला आले, अशी टीकाही राऊतांनी केली.