राज्यात जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहेत, तोपर्यंत मराठी माणसाला सुख आणि शांतता लाभणार नाही, अशी सडकून टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलीय. एवढच नाही तर राज्यात सत्तांतर घडवावं लागेल असेही राऊत म्हणाले. तसेच सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांवर ताबडतोब खटले दाखल करावे असेही राऊत म्हणाले.
काही मराठा आंदोलकांनी मातोश्रीवर जाऊन आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, याबाबत राऊतांना प्रश्न विचारला होता. यावर बोलताना राऊत म्हणाले की, ही सगळी भाजपची कारस्थानं आहेत. मनोज जरांगेना निवडणूक लढवण्याचा पूर्ण अधिकार आज सकाळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी मनोज जरांगे यांच्याविषयी स्पष्ट मत मांडले.
यावेळी बोलताना त्यांनी,”मनोज जरांगे पाटील हे एक स्वतंत्र विचारांचे गृहस्थ आहेत. ते अजून राजकारणात आले नाहीत. ते त्यांच्या समाजासाठी संघर्ष करत आहेत. त्यांचे प्रश्न आम्हालाही माहित आहेत असे राऊत म्हणाले. या देशात लोकशाही आहे कोणीही निवडणूक लढवू शकतो. म्हणून जरांगे पाटील यांनी काही भूमिका घ्यायची असेल तर ते घेऊ शकतात, भारतीय राज्यघटनेने त्यांना अधिकार दिलाय” असे संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी केलं शर्मिला ठाकरेंचं कौतुक दरम्यान, महिला अत्याचाराच्या मुद्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी केलेल्या निवदेनाचे संजय राऊत यांनी कौकुत केलं.
महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कोणताही धर्म नसतो, असं वक्तव्य शर्मिला ठाकरे यांनी केलं होतं. त्यांचे हे निवेदन आवडल्याचे राऊत म्हणाले. गेल्या काही काळापासून राज्यात महिलांवर अत्याचार वाढले आहेत. यामध्ये सगळ्याच धर्माचे लोक आहेत. ही एक विकृती आहे. ही विकृती ज्याच्या मनामध्ये आहे.
तो कोणत्याही धर्माचा असो त्याला फासावर लटकवलं पाहिजे असे मत राऊतांनी व्यक्त केलं. यासंदर्भात जाणकार, सुशिक्षीत महिलांनी पुढे आलं पाहिजे”असे राऊत म्हणाले. उदय सामंत यांनी राजकारणात अनेक वेळा बेईमानीचा जिहाद केला मंत्री उदय सामंत यांच्यावरही संजय राऊतांनी टीका केली.
“उदय सामंत यांनी राजकारणात अनेक वेळा बेईमानीचा जिहाद केला असल्याचे राऊत म्हणाले. त्याच्यावर आम्हाला एक कायदा आणावा लागेल असा टोला देखील राऊतांनी सामंतांना लगावला. तसेच यावेळी राऊतांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार सुनिल तटकरे यांच्यावरही टीका केली. सुनिव तटकरे हा फिरता रंगमंच आहे. अजित पवारांना अडचणीत आणण्याचं काम तटकरेंनी केल्याचे “राऊत म्हणाले.