महायुती सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवा. त्यांच्या समस्या, प्रश्न सोडवून ‘राष्ट्रवादी’ची ताकद वाढवा. अकरा ऑगस्टला कोल्हापूर दौऱ्यावर येणाऱ्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभूतपूर्व स्वागत करूया, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी येथे केले.
जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मार्केट यार्ड येथील कार्यालयात दौऱ्याच्या पूर्व नियोजनाच्या बैठकीत ते बोलत होते. आमदार राजेश पाटील, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, ‘गोकुळ’चे संचालक युवराज पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.
महिला जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे, हातकणंगले तालुकाध्यक्ष संभाजी पोवार, ‘गोकुळ’चे संचालक किसन चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले.
जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे, शेतकरी संघाचे अध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक भैया माने, रणवीरसिंह गायकवाड, महिला शहराध्यक्ष रेखा आवळे, प्रवीणसिंह भोसले, महेंद्र चव्हाण, संतोष पाटील, विकास पाटील आदी उपस्थित होते. युवक अध्यक्ष नितीन दिंडे यांनी स्वागत केले. शहराध्यक्ष आदिल फरास यांनी प्रास्ताविक केले.
पक्ष कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते अकरा ऑगस्टला सकाळी दहा वाजता इचलकरंजी येथे पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन होईल.
दुपारी बारा वाजता कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉलमध्ये पदाधिकाऱ्यांचा मेळावा, कागलमधील विकासकामांचे लोकार्पण करून सायंकाळी पाच वाजता निपाणीवेस येथे सुमारे २५ हजार महिलांच्या उपस्थितीत मेळावा होणार असल्याचे पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.