गेल्या काही दिवसापासून राज्यात मराठा आरक्षणाची मागणी सुरू आहे. आज मनोज जरांगे पाटील सोलापूर दौऱ्यावर आहेत, जरांगे पाटील राज्यात शांतता रॅली काढणार आहेत. दरम्यान, आज मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मंत्री छगन भुजबळ आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. ‘तिनही बाजूंनी यांनी मराठ्यांचं वाटुळं केलं आहे.
तुम्ही दहा टक्के आरक्षण देऊन आमचं वाटूळं केलं. EWS रद्द करुनही मराठ्यांचं वाटुळ केलं आहे’, असा आरोपही मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर केला.
यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांना प्रत्युत्तर दिले, दोन दिवसापूर्वी आंबेडकर यांनी सगेसोयऱ्याची व्याख्या आणि मागणी आम्हाला मान्य नाही असं सांगितलं होतं. यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले, ते आता सत्तेत कुठे आहेत. त्यांना मान्य आहे की नाही यापेक्षा आम्हाला सरकारने आश्वासन दिले आहे हे महत्वाच आहे.
आश्वासन पूर्ण केलं नाहीतर सरकार जाणार, अशी टीकाही जरांगे पाटील यांनी केली. सरकार फक्त भुजबळ यांचे ऐकत आहे, त्यांना बळ देण्याचं काम फडणवीस करत आहेत. त्यांना आता भोगाव लागणार आहे. सरसकट मराठ्यांना आरक्षण द्यायला पाहिजे. यो लोकांमुळे राज्यातील भाजप संपवणार आहेत, असा आरोपही जरांगे पाटील यांनी केला.
“आम्हा गरीब मराठ्यांना आरक्षण हवं हेच फक्त दिसत आहे. आम्ही जातीसाठी भिजत आहे. तुम्हीच आरक्षण दिलं म्हणून मराठ्यांनी परत तुम्हाला आणलं, आता परत नाही दिलं तर परत घालवणार. हे सरकार विचित्र आहे. हे आधी देतात आणि परत घेतात. एका बाजूने द्यायचं आणि दुसऱ्या बाजूने वाटुळं करायचं. नोंदी शोधल्या पण प्रमाणपत्र देण्यासाठी कक्षच नाही, असंही जरांगे पाटील म्हणाले.
EWS रद्द करण्याची मागणी नव्हती “हे लोक जाणून बुजून घात करत आहेत, १० टक्के मागितलं नाही तरीही कायदा पारित केला आणि EWS रद्द केलं. EWS रद्द करण्याची मागणी मराठ्यांची नव्हती. आता त्याचाही फायदा होत नाही. प्रमाणपत्र तातडीने देऊ नका असंही सरकारने सांगितलं आहे. तिनही बाजूंनी त्रास देत आहेत.
दहा टक्के आरक्षण देऊन मराठ्यांचं वाटोळ केल्याचं लोकांच्या लक्षात आले आहे आणि ही सगळी चाल देवेंद्र फडणवीस यांची आहे, असा आरोपही मनोज जरांगे पाटील यांनी केला.