राज्यभरातील महिला लाडक्या बहीण योजनेसाठी अर्ज भरत आहेत. राज्यातील बहुतेक महिलांनी योजनेसाठी अर्ज भरला असून पहिल्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
या योजनेच्या पहिल्या हप्त्याचे पैसे येत्या दोन ते तीन दिवसांत खात्यात येणार असल्याची माहिती मिळत आहेत. यादरम्यान, आमदार रवी राणा यांनी लाडकी बहीण योजनेविषयी वक्तव्य केलं आहे. ‘आशीर्वाद दिला नाही, तर तुमच्या खात्यातून १५०० रुपये परत घेणार आहे, असं वक्तव्य रवी राणा यांनी केलं आहे.
अमरावतीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं प्रमाणपत्र वितरण सोहळा पार पडला. या सोहळ्याला आमदार रवी राणा यांनीही हजेरी लावली. या सोहळ्यात आगामी विधानसभा निवडवणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांना मोठा इशारा दिला.
आमचं सरकार आल्यावर लाडकी बहिण योजनेचे 1500 रुपयेचे 3 हजार करू, तर आता त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. मला ज्यांनी आशीर्वाद दिला नाही,
मी तुमचा भाऊ ते 1500 रुपये तुमच्या खात्यातून परत घेणार, असं वक्तव्य रवी राणा यांनी दिला. ज्यांचं खाल्लं त्याला जागलं पाहिजे. तर सरकार देत राहते, पण सरकारला आशीर्वादही दिला पाहिजे, असं मत रवी राणा यांनी मांडले
विजय वडेट्टीवार यांची रवी राणांवर टीका आमदार रवी राणांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. रवी राणांनी लाडक्या बहीण योजनेवर विधान केलं आहे.
आमदार रवी राणा यांच्या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘महिलांना दिलेला पैसा तुमच्या बापाचा आहे का? असा सवाल करत विजय वडेट्टीवार यांनी रवी राणा यांच्यावर निशाणा साधला आहे.