उद्धव ठाकरे : काँग्रेस, राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, मी पाठिंबा देतो…

Photo of author

By Sandhya

उद्धव ठाकरे

महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा संयुक्त मेळावा शुक्रवारी माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात पार पडला. या मेळाव्याच्या माध्यमातून मविआने विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले.

यावेळी बोलताना उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री हे धोरण राबविण्यापेक्षा अगोदर मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरवा, असे सांगत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, मी पाठिंबा देतो, असे जाहीर केले.  

ठाकरे म्हणाले, आपल्यात काड्या घालणारे काही लोक महायुतीत बसलेले आहेत. ते म्हणतात की, आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? येथे शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण हे देखील बसलेले आहेत. मी सांगतो मुख्यमंत्रिपदासाठी तुमच्यापैकी कोणाचाही चेहरा असेल तर तुम्ही जाहीर करा, मी पाठिंबा देतो. 

महायुती सरकार घाबरणारे सरकार आहे, अशी टीका शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी केली. तर १५०० रुपयांत बहिणींचे प्रेम विकत घेऊ शकत नाही, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला.

उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांवर निशाणा साधत गुलाबी रंग महाराष्ट्राला धार्जिणा नसल्याचा हल्लाबोल केला. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, लोकसभेत भाजपच्या १० वर्षांच्या मनमानीला जनतेने उत्तर दिलेले आहे. 

जागा वाटपावरून भांडण नको जागावाटपावरून भांडण करू नका, वज्रमूठ कामात दिसली पाहिजे. भाजपसोबत जो धोका घेतला तो नको मला. ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री असे ठरवले जायचे. पण त्यात एकमेकांच्या जागा पाडल्या जायच्या, असे ठाकरे म्हणाले.

Leave a Comment