खासदार सुप्रिया सुळे : जो न्याय दुसऱ्या राज्याला, तोच न्याय महाराष्ट्राला मिळावा!

Photo of author

By Sandhya

खासदार सुप्रिया सुळे

स्वातंत्र्य दिनानिमित्त शरद पवार गटातर्फे मुंबईतील प्रदेश कार्यालयात ध्वजारोहण करून तिरंग्याला सलामी देण्यात आली. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान दिलेल्या सर्व महापुरुषांना वंदन करून राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रध्वज फडकवला. आजचा दिवस साजरा करताना जो न्याय दुसऱ्या राज्याला तोच न्याय महाराष्ट्राला मिळावा, अशी अपेक्षा यावेळी सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.

या वर्षी महाराष्ट्रात मागील वर्षाच्या तुलनेत चांगला पाऊस झाला आहे. परंतु, राज्यातील काही भागांमध्ये हवा तेवढा पाऊस पडलेला नाही. ज्या भागामध्ये पाऊस कमी पडला त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पिण्याच्या प्राण्याचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई, बेरोजगारी तसेच भ्रष्टाचाराचे आव्हान राज्य आणि देशासमोर आहे, असे सुळे म्हणाल्या.

आपल्यासमोरदेखील वर्षापूर्वी एक संघर्ष आला होता. आपण मागील स्वातंत्र्य दिनी इथे होतो तेव्हा ना पक्ष होता, ना चिन्ह होते. तुम्ही सर्व पवार साहेबांच्या सोबत आणि मूळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारासोबत उभे राहिला. तुमचे सर्वांचे कितीही कौतुक केले आणि आभार मानले तरी कमीच आहेत. गेल्या वर्षापासून आपण संघर्ष करीत आहोत. आणि शेवटी सत्याचाच विजय होतो.

त्यासाठी महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचे आभार मानले पाहिजेत. पक्ष, चिन्ह नसताना महाविकास आघाडीचे ३३ खासदार जनतेने निवडून दिले आहेत. महाराष्ट्राने आपल्याला यश दिले; पण, या यशाबरोबर आपल्याला प्रचंड जबाबदारी दिलेली आहे. प्रत्येकाने आपल्या जबाबदारीचे पालन करावे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Leave a Comment