बदलापूर, दौंड, कोल्हापूर व इतर अनेक ठिकाणी घडलेल्या मुलींवरील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ पुरंदर तालुका महाविकास आघाडीच्या वतीने आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी ( दि २४ ) सासवड येथील शिवतीर्थावर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून तसेच राज्य शासन आणि राज्य शासनाविरोधात घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला. याप्रसंगी या घटनांतील नराधमांना फाशीची शिक्षा द्या, गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी करण्यात आली.
याप्रसंगी सासवडचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी निवेदन स्वीकारले. यानंतर झालेल्या बैठकीत बोलताना महाविकास आघाडीचे प्रवक्ते नंदूकाका जगताप यांनी, महाराष्ट्र घडत असलेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध करीत राज्यातील गृह खात्याच्या गलिच्छ कारभाराविरोधात तिव्र शब्दात निषेध करीत अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी, बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेसाठी
कठोर कायदे करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. नराधमाला फाशी देण्याची मागणी केली.
याप्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप पोमण, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अभिजीत जगताप, माजी जि प सदस्य सुदामराव इंगळे, संभाजीराव झेंडे, दत्ता चव्हाण, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संजय टिळेकर, निरा मार्केट कमिटीचे देविदास कामथे युवक काँग्रेसचे अध्यक्ष चेतन महाजन, राष्ट्रवादीचे पुष्कराज जाधव,
माजी उपनगराध्यक्ष यशवंतकाका जगताप, विजय वढणे, हारून बागवान, संतोष गिरमे, संतोष खोपडे, नंदकुमार जगताप, सागर जगताप, राजेंद्र जगताप, काँग्रेसच्या महिलाध्यक्षा सुनिता कोलते, राष्ट्रवादीच्या महिलाध्यक्षा अॅड गौरी कुंजीर, प्रहारच्या सुरेखा ढवळे, मंजुष गायकवाड, मनिषा बडदे, प्रीया जगताप, दत्ताराजे शिंदे, हाजी रफिकभाई शेख, तुषार जगताप, तुषार ढुमे, सौरभ जाळिंद्रे, चंद्रकांत बोरकर, संभाजी काळाणे, मोबीन बागवान यांसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.