महाविकास आघाडीत जागावाटपावर चर्चा होईल तेव्हा थोडे वाद होणे अपेक्षित आहे. मात्र, जागावाटपावरून निर्माण झालेले वाद मिटवून आम्ही एकमेकांना समजून घेऊ व पुढे जाऊ, असा विश्वास असे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
जयंत पाटील म्हणाले, महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा आहेत. प्रत्येक मतदारसंघात वेगवेगळी परिस्थिती आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत जागावाटप होईल, तेव्हा काही वाद होणे अपेक्षित आहे. त्या वादांची चर्चा देखील होऊ शकते.
अगदीच वाद होणार नाहीत, असे होणार नाही. शेवटी आम्हाला एकत्र राहायचं आहे, त्यामुळे आम्ही सगळे एकमेकांना समजून घेऊ आणि मार्ग काढू, असा आम्हाला आमचा विश्वास आहे.
कारण कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडी एकत्र राहिली पाहिजे. निवडणुकीच्या काळात आम्हाला एकत्रितपणे लढायचं आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.