रोहित पवार : भाजपाचा अंतर्गत सर्व्हे, अजित पवारांना ऑफर…

Photo of author

By Sandhya

रोहित पवार

आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने परवाच भाजपाचा अंतर्गत सर्व्हे आला असून त्यात अजित पवारांच्या गटाला ७-११ जागा, शिंदे गटाला १७-२२ जागा आणि भाजपाला ६२-६७ जागा मिळून लोकसभेची

पुनरावृत्ती होण्याचा अंदाज आल्यानं भाजपामध्ये भीती पसरलीय, त्यातूनच केंद्रीय स्तरावरून अनेक हालचाली सुरू झाल्या आहेत असा दावा शरद पवार गटाचे राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

रोहित पवारांनी ट्विटरवरून म्हटलंय की, भाजपाच्या एका मोठ्या केंद्रीय नेत्याने परवा अजितदादांना काही ठराविक जागा ऑफर केल्या असून अजितदादांनी पवार साहेबांच्या राष्ट्रवादीच्या

नेत्यांना मतदारसंघातच रोखण्यासाठी त्यांच्या विरोधात मोठे नेते उभे केले किंवा अपक्ष उभे करण्याची तयारी दाखवली तर ६ ते ७ जागा अतिरिक्त देण्याचीही ऑफर दिलीय असं त्यांनी म्हटलं आहे. 

त्याशिवाय कर्जत जामखेड संदर्भात कुछ भी कर के, अभी उसे वही पे रोको असं सांगितल्याने कर्जत जामखेडची लढत राज्यात सर्वाधिक लक्षवेधी आणि तेवढीच इंटरेस्टिंग होणार हे नक्की आहे.

पण मीही या महाकाय शक्तीसोबत दोन हात करायला सज्ज असून या महायुद्धात कर्जत जामखेडकर स्वाभिमान आणि निष्ठा काय असते, ते या महाशक्तीला दाखवून देतील असा विश्वास आमदार रोहित पवारांनी व्यक्त केला. 

Leave a Comment

You cannot copy content of this page