मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : कुटुंब भेट योजनेतून एक कोटी कुटुंबापर्यंत पोहोचणार…

Photo of author

By Sandhya

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सक्षम करण्यासाठी आम्ही कुटुंब अभियान राबवत आहोत. या योजनेसाठी शिवसैनिक घरोघरी जाणार आहेत मी आज पासून सुरुवात केलेली आहे. महाराष्ट्रात एक लाख शिवसैनिक दररोज १५ घरापर्यंत पोहोचतील, आठवडाभरात आम्ही एक कोटी लाभार्थ्यांपर्यंत पोहचू असा विश्वास महाराष्ट्राचे मुखि्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच प्रत्येक शिवसैनिकाने १५ कुटुंबांची भेट घ्यायची आहे योजनेचा लाभ मिळाला आहे की नाही हे तपासायचे आहे मिळाला नसेल तर त्याची अडचण दूर करायचे आणि मार्गदर्शन करायचे आहे. तसेच, त्यांच्या इतर अडचणी जाणून घेऊन त्याही सोडवायच्या आहेत.

दुसऱ्या आठवड्यामध्ये देखील असंच अभियान सुरू राहील. कार्यकर्ते लाभार्थ्यापर्यंत पोहोचत आहेत की नाही याचाही ट्रॅक रेकॉर्ड आम्ही ठेवणार आहोत. सरकारच्या इतर योजना देखील आहेत त्यांच्या संदर्भात देखील अचूक माहिती त्या परिवाराला द्यायची आहे.

शासनाने घेतलेले निर्णय आणि आपण घेतलेले निर्णय लाडकी बहीण ही तर सुपरहिट तर झालीच त्याचा लाभ लाडक्या बहिणी घेत आहेत. मी मुख्यमंत्री असोलो तरी एक जमिनीवरचा कार्यकर्ता आहे मी आदेश देऊन नव्हे तर रस्त्यावरती उतरून घरोघरी जात आहे योजनेचे महत्त्व पटवून देण्यासाठी मी स्वतः घरी जात आहे असा टोलाही त्यांनी लगावला.

एक महिन्यात योजना आली आणि ती महिन्याभराच्या आत सुरू देखील झाली आतापर्यंतच्या इतिहासात इतक्या जलद गतीने काम झाले नव्हते ते आमच्या सरकारने करुन दाखविले.

मुख्यमंत्री लाडकी योजनेबाबत लावलेल्या बॅनर वर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो नाही यााबत विचारले असता शिंदे म्हणाले की, ही श्रेयवादाची लढाई नाही सरकार म्हणून आपण काम करत आहोत. शासन आपल्या दारी जसे राबवले तसेच आम्ही तिघेही लाडकी बहीण योजनेचा धानादेश वाटपासाठी जातो.

Leave a Comment