चंद्रशेखर बावनकुळे : ‘उद्धव ठाकरेंना बाहेर काढायचा प्रयत्न काँग्रेस करतंय’…

Photo of author

By Sandhya

चंद्रशेखर बावनकुळे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विधानसभा निवडणुकीआधी महायुतीतून बाहेर काढणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. यावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू  आहेत. यावर आथा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली.

‘उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे पे वर्कर अजित पवार यांना आम्ही महायुतीतून बाहेर काढतोय, ते बाहेर जाणार आहे, हे सर्व नॅरेटीव्ह सेट करत आहेत. त्यांनी यासाठी मोठ मोठ्या वॉर रुम केल्या आहेत. त्यातून अशा बातम्या सोडल्या जातात. या उलट उद्धव ठाकरेंना बाहेर काढण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करत आहे, असा दावा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.  

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ठाकरे गटाचे प्रवक्ते उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबत बोलत आहेत. पण, महाविकास आघाडीमध्ये बाकीच्या लोकांना हे मान्य नाही. उलट महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरे यांना बाहेर काढण्याच्या चर्चा विदर्भात सुरू आहेत. नागपुरात तर ठाकरेंना कोण जागाही द्यायला तयार नाही.

काल काँग्रेसने बारा जागांवर दावाही केला. उपराजधानीमध्ये उद्धव ठाकरे यांना एकही जागा मिळणार नाही. याचा अर्थ काय?, असा सवालही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. 

‘नागपुरात ठाकरेंना एकही जागा देणार नाहीत’  “उद्धव ठाकरेंना आम्ही नाागपुरात तीन जागा दिल्या होत्या, आता ठाकरेंना एकही जागा देणार नाही असं काँग्रेसने सांगितलं आहे.

आता हळूहळू ठाकरेंना महाविकास आघाडीतून बाहेर काढत आहे, असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला. “आम्ही शरद पवार यांना धक्का मारु, उद्धव ठाकरे यांना धक्का मारु आणि आमचा मुख्यमंत्री करु असा सुतोवाच एका काँग्रेसच्या जबाबदार नेत्यांनी केला आहे, असंही बावनकुळे म्हणाले.

आमच्याकडे महायुती पक्की आहे, आमची समन्वय समिती असणार आहे. तीन नेत्यांची समन्वय समिती असणार आहे, लोकसभेला ज्या चुका झाल्या. त्या चुका विधानसभेला करायच्या नाहीत, त्यासाठी आम्ही समिती स्थापन करणार आहे, असंही बावनकुळे म्हणाले. 

“विधानसभा निवडणुकीसाठी समन्वय समिती करणार आहे. यासाठी आज संयोजन समितीची बैठक आहे. गटबाजी होऊ नये यासाठी २८८ समन्वय समिती गठीत होणार आहे, असंही बावनकुळे म्हणाले. 

Leave a Comment