पुण्यात मेट्रोवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आंदोलन…

Photo of author

By Sandhya

पुण्यात मेट्रोवरून राजकारण तापलं; महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आंदोलन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा गुरुवारी अतिवृष्टीच्या अंदाजामुळे रद्द करण्यात आली. मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्याच्या हट्टापायी पुणे मेट्रोच्या शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट या मार्गीकेचे लोकार्पण रखडले आहे. यामुळे भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडी यांच्यात मेट्रो उद्घाटनावरून चांगलेच राजकारण तापले आहे.

आज महाविकास आघाडीतर्फे मेट्रोचे उद्घाटन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी महाविकास आघाडीकडून शिवाजीनगर जिल्हा न्यायालय येथे आंदोलन केले जात आहे. तसेच नागरिकांसाठी मेट्रो सेवा सुरू करण्याची मागणी देखील करण्यात येत आहे.

जनतेचा पैशातून तयार करण्यात आलेली मेट्रो मार्गीका तयार असूनही कोणा एका व्यक्तीच्या हट्टासाठी ती वापराविना पडून राहणे हा जनतेच्या पैशांचा अपव्यय आहे, असे म्हणत महविकास आघाडीने आज जिल्हा न्यायालय येथे आंदोलन केले आहे. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळत आहे.

दरम्यान, याच प्रकल्पाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी २९ सप्टेंबर रोजी ऑनलाईनच्या माध्यमातून केले जाणार आहे. परंतु महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मेट्रो लवकरात लवकर सुरू करावी, यासाठी आंदोलन सुरू केले आहे.

यावेळी कॉँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी म्हंटले की, “मेट्रो आजच्या आज सुरू झाली पाहिजे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन कालचे उद्घाटन केले जाणार होते, पाच वर्षामध्ये, पाच वेळा मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधानांनी केले. म्हणजे ते राजकीय लोभासाठी आणि आम्ही देशासाठी प्रयत्न करत आहोत. या उद्धघटनासाठी जनतेच्या पैशाचा चुराडा झाला होतोय.”  

Leave a Comment