अंबादास दानवे : “शंभर टक्के उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री असतील”

Photo of author

By Sandhya

अंबादास दानवे

महाविकास आघाडी अस्तित्वात आल्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. पण, यावेळी पुन्हा महाविकास आघाडीला बहुमत मिळाले, तर मुख्यमंत्री कोण होणार? या प्रश्नाभोवती गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होत आहे.

याच मुद्द्यावर बोलताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, “एका दिवसासाठी का होईना, पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत अशी आमची इच्छा आहे.” 

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा कोण? याबद्दल वेगवेगळे आडाखे मांडले जात आहेत. याबद्दल एका मुलाखतीत अंबादास दानवे यांनी भाष्य केले. 

“भाजपासोबत असतो तरीही मंत्रिपदे मिळाली असती” काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षालाच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून नको, असं वाटतंय का? या प्रश्नाला उत्तर देताना अंबादास दानवे म्हणाले, “असं नाही. उलट त्यांनी मिळूनच उद्धवजींना मुख्यमंत्री बनवलं होतं.

आम्ही शिवसेनेने ही भूमिका घेतली म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेवर बसायला मिळाले.” शंभर टक्के उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील -दानवे “शिवसेनेने ही भूमिका घेतली म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना सत्तेवर बसायला भेटले.

काँग्रेस तीन नंबर होती. हेही लक्षात ठेवले पाहिजे. पण, उद्धव ठाकरेंनी भूमिका घेतली म्हणून यांच्या वाट्याला मंत्रि‍पदे आली. तसे तर आम्हाला त्यांच्याकडूनही (भाजपा) मंत्रि‍पदे मिळाली असती ना? भाजपाबरोबर राहिलो असतो, तर…”, असा उलट सवाल अंबादास दानवेंनी उपस्थित केला. “यावेळीही शंभर टक्केच उद्धव ठाकरेंच मुख्यमंत्री असतील”, असेही अंबादास दानवे म्हणाले. 

Leave a Comment